अनुभूतीतून साकारलेली लक्ष्मण शिंदे यांची 'काटेरी वाट' काव्यसंग्रह:- कवी हनुमंत चांदगुडे.

Maharashtra varta

 अनुभूतीतून साकारलेली लक्ष्मण शिंदे यांची  'काटेरी वाट' काव्यसंग्रह:-  कवी हनुमंत चांदगुडे.

काटेरी वाट या काव्यसंग्रहाचे प्रकाशन व कवी संमेलन उत्साहात संपन्न.



नसरापूर (प्रतिनिधी)

"काटेरी वाट" या कवितासंग्रहाचे कवी  लक्ष्मण शिंदे यांनी त्यांनी उपभोगलेले लहानपणातील जीवन, शेतकरी हालअपेष्टा, निसर्गातील कवितांचा समावेश केला असून, कवितासंग्रह उद्भबोधक व निसर्गातील घडणाऱ्या घटनांची जनजागृती करणारा आहे. अनुभूतीतून साकारलेली लक्ष्मण शिंदे यांची  काटेरी वाट काव्यसंग्रह आहे असे प्रतिपादन नामवंत कवी हनुमंत चांदगुडे यांनी केले.

 लक्ष्मण शिंदे भोर पुणे लिखित "काटेरी वाट" या कवितासंग्रहाचे  बनेश्वर ता. भोर जि. पुणे येथे निसर्गाच्या सानिध्यात प्रकाशन झाले. कवितासंग्रहाची प्रस्तावना नामवंत कवी हनुमंत चांदगुडे यांनी केली आहे. 

पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे प्रसिद्ध साहित्यिक, पाठ्यपुस्तक कवी व कार्यक्रमाध्यक्ष हनुमंत चांदगुडे, सातारा खटाव चे जिल्हा न्यायाधीश प्रतापसिंह काळे ,सामाजिक वनीकरण पुण्याचे वनसंरक्षक हनुमंत धुमाळ ,सामाजिक वनीकरण पुण्याचे सहाय्यक वनसंरक्षक रामदास पुजारी, पाठ्यपुस्तक कवी बाळकृष्ण बाचल, वनक्षेत्रपाल खेडचे अनिल लांडगे ,व ज्येष्ठ इतिहास संशोधक सुरेशराव शिंदे व विविध मान्यवर, पाठ्यपुस्तकातील कवी, वन विभागातील अनेक अधिकारी कर्मचारी, नसरापूर ग्रामस्थ, महाराष्ट्रातून आलेले नामवंत कवी  उपस्थितीत होते.

कवितासंग्रहाच्या प्रकाशनानंतर त्याच ठिकाणी निमंत्रित कवींचे कविसंमेलन पार पडले. या कविसंमेलनात महाराष्ट्रातून आलेल्या सुमारे पन्नास कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार सर यांनी  केले.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मणराव शिंदे यांनी केले.

(हनुमंत धुमाळ, भा.व. से, वनसंरक्षक सामाजिक वनीकरण पुणे यांनी  लक्ष्मण शिंदे हे वन विभागात लेखापाल पदावर कार्यरत असून त्यांनी त्यांची जबाबदारी सांभाळून कवितासंग्रह प्रकाशित केला, हे एक आश्चर्य आहे. त्यांच्या कविता वनविभागाला प्रेरक ठरतील यात शंका नाही.)

To Top