वारकरी संप्रदायाची सेवा करणे:- राज्य अध्यक्ष राजाभाऊ चोपदार.
भोर तालुका वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष व कार्यकारिणी निवड समारंभ संपन्न.
नसरापूर (प्रतिनिधी):-पत्रकार विठ्ठल पवार.
सर्वच संतांनी त्यांच्या आचरणातून व साहित्यातून समाजातील वाईट चालीरितींविरुद्ध व अंधश्रद्धेविरुद्ध प्रहार केलेले आहेत. सनातन्यांनी केलेला छळ सोसूनही संत एकनाथ महाराज व संत तुकाराम महाराजांनी व संतांनी समाज प्रबोधनाचे कार्य सतत चालू ठेवले. वारकरी सेवा संघाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची सेवा करणे हे मुख्य उद्देश संघटनेचा असून तो अविरत सुरु आहे पुढेदेखील सुरू राहील असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष ह.भ.प. राजाभाऊ चोपदार यांनी केले.
खोपी ता.भोर येथे महाराष्ट्र राज्य वारकरी सेवा संघ व पुणे जिल्हा वारकरी सेवा संघ ,संलग्न भोर तालुका वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष व कार्यकारणी पदग्रहण व गौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाप्रसंगी भोर तालुका वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष पदी संजय बोरगे, उपाध्यक्षपदी तानाजी नाईलकर ,संभाजी जगताप तर सचिवपदी दिलीप खुडे, सहसचिव स्वाती मुसळे, ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभाऊ बाठे, खजिनदार मच्छिंद्र धावले, संघटक प्रतीक इंदलकर, संपर्कप्रमुख सर्जेराव शिंदे, सदस्य नितीन बिडकर ,संघटक कुमार मारणे, सदस्य विष्णू चंदनशिव सदस्य सचिन पवार ,सदस्य शोभाताई खुटवड, सदस्य वचकल ताई यांची निवड करत त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्य वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष राजाभाऊ चोपदार ,राज्य सचिव एडवोकेट माधवीताई निगडे, पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष बाळासाहेब बारवकर ,उपाध्यक्ष निवृत्ती बाबा कोळेकर ,पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे कार्यकारी अध्यक्ष विलास शेठ बालवडकर, जिल्हा सचिव प्रमोद गवळी, जिल्हा सदस्य नागेश फुगे, बारामती तालुका अध्यक्ष दत्ता शेठ गावडे व महाराष्ट्र राज्य वारकरी सेवा संघाचे राज्य, व जिल्हा,विविध तालुक्यातील पदाधिकारी,सदस्य व खोपी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
निवेदक विठ्ठल पवार यांनी अतिशय, साध्या, समर्पक ,सोप्या आणि ओघवत्या शैलीत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावी केले.

