भोर पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्षपदी गोरड म्हसवली गावचे पोलीस पाटील सुरेश चव्हाण तर वारंवड चे पोलीस पाटील सुधीर दिघे पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड.

Maharashtra varta

 भोर पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्षपदी गोरड म्हसवली गावचे पोलीस पाटील सुरेश चव्हाण तर वारंवड चे पोलीस पाटील सुधीर दिघे पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड.



भोर (प्रतिनिधी)

पोलीस पाटील हे पद सेवेचे आहे. ती सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करत जनसंपर्क वाढवत, पोलीस पाटील पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय व प्रशासनास अधिकाधिक सहकार्य करून संघटनेच्या माध्यमातून पोलीस पाटलांचे प्रश्न सोडवले जातील, तालुकास्तरावर असलेली पोलीस पाटील संघटना  कार्यक्षम बनवा असे  प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी केले.

महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संलग्न, भोर तालुका पोलीस पाटील संघ अध्यक्षपद व कार्यकारणी पदग्रहण व पोलीस पाटील मार्गदर्शन सोहळा नसरापूर ता. भोर येथे जानकीराम मंगल कार्यालयात संपन्न झाला.त्यावेळेस शिंदे बोलत होते.

भोर तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्षपदी गोरड म्हसवली गावचे पोलीस पाटील सुरेश चव्हाण तर वारंवड चे पोलीस पाटील सुधीर दिघे पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. व  कार्यकारणीचे पदग्रहण, सनद पत्र वाटप करत सन्मान सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील,पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त माधवराव जगताप, राजगड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन राव पाटील, पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष साहेबराव राळे पाटील, पुणे जिल्हा महिला पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षा हर्षदा संकपाळ, पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघाचे कार्याध्यक्ष गोरक्षनाथ नवले पाटील

 जिल्हा कार्यकारिणीमधील नथुराम सुकाळे पाटील, विलास हिंगे पाटील, बाळासाहेब साने पाटील, मेघा तांगडे पाटील, दिपाली खोपडे पाटील, अनिल डोंबे पाटील तसेच  सारिका झेंडे, नीता वाघमारे शारदा दातीर, दिपाली तळेकर व पुणे जिल्हा पोलीस पाटील पदाधिकारी तसेच पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी आणि भोर तालुका पोलीस पाटील पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्हा महिला आघाडी पोलीस पाटील च्या संघटनेचे कार्यकारी उपाध्यक्ष उर्मिला धुमाळ यांनी केले तर या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या महिला आघाडी उपाध्यक्ष वैशाली जगताप यांनी  आभार मानले.तर उपस्थितांचे आभार पुणे जिल्हा महिला आघाडी पोलीस पाटील च्या कार्यकारी उपाध्यक्ष उर्मिला धुमाळ यांनी मानले

To Top