वेळू ग्रामपंचायतीच्या वतीने अल्प दरात ओपीडी सुरू. ग्रामपंचायत वेळूचा पुढाकार.

Maharashtra varta

 वेळू ग्रामपंचायतीच्या वतीने अल्प दरात ओपीडी सुरू.

        ग्रामपंचायत वेळूचा पुढाकार



खेडशिवापुर (प्रतिनिधी)

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आयुर्वेद आणि ग्रामपंचायत वेळू  यांच्या संयुक्त विद्यमाने  ओपीडी अल्प ,दरात वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली आहे.


वेळू ता. भोर येथे सर्वसामान्य नागरिकांना सहज व सुलभ पणे कमीत कमी किमतीत वैद्यकीय व्यवस्था सेवा  मिळावी, यासाठी वेळू ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने अल्पदरात ओपीडी सुरू करण्यात आल्याची माहिती वेळूचे  सरपंच अमोल पांगारे यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.

या अल्प दरात तील सेवेचा लाभ शेकडो नागरिकांनी  वेळू येथे घेतला.नागरिकांनी ग्रामपंचायतीला धन्यवाद  देत समाधान व्यक्त केले आहे.

आदर्श मा.सरपंच व भोर तालुका  काँग्रेस नेते, ज्ञानेश्वर माऊली पांगारे यांच्या संकल्पनेतून गोरगरिबांची असणारी मागणी लक्षात घेऊन या सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे.यावेळेस  सोमनाथ सोमानी, सरपंच अमोल पांगारे, ईश्वर पांगारे,  शुभांगी काटकर, संचालिका भारती विद्यापीठ आयुर्वेद कॉलेज पुणे,डॉ.वैद्य, डॉक्टर वीरेंद्र पवार  व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

To Top