व्यवसाय प्रामाणिकपणा ठेवल्यास निश्चित यश:- आमदार संग्राम थोपटे
भोंगवली येथे "रानवारा" हॉटेल चे शानदार उद्घाटन संपन्न.
भोर ( प्रतिनिधी)
व्यवसायात चिकाटी, सचोटी व प्रामाणिकपणा ठेवल्यास यश निश्चितच मिळते. त्यासाठी उद्योग किंवा अन्य क्षेत्रात, वाटचाल करणे महत्त्वाचे आहे. कोणताही व्यवसाय सुरू केला तर ग्राहकांना दर्जेदार,गुणवत्ता पूर्ण सुविधा पुरवणे हे महत्त्वाचे असते. त्याच पद्धतीने या रानवारा हॉटेलमध्ये ग्राहकांना रुचकर चविष्ट स्वादिष्ट भोजन मिळाल्यानंतर हॉटेलचा नावलौकिक होईल असे प्रतिपादन भोर वेल्हा मुळशी आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
भोंगवली ता. भोर येथे संग्राम भोसले व परिवाराने सुरु केलेले "रानवारा गार्डन रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज हॉटेल उद्घाटन समारंभाप्रसंगी आमदार संग्राम थोपटे बोलत होते. उद्योग व्यवसाय सुरू करताना, त्यामध्ये जोखीम पत्करावी लागते. कोणतीही जोखीम न स्वीकारणे ही सर्वात मोठी जोखीम आहे. व्यवसाय संपूर्ण ताकदीनिशी व बाजारपेठेचा अनुभव व ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन करणे महत्त्वाचे आहे.
भोर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेंद्र सोनवणे व आदर्श मा. जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांनी संग्राम भोसले यांच्या हॉटेल उद्घाटनाप्रसंगी शुभेच्छा देत अभिनंदन केले.
या हॉटेल उद्घाटन समारंभाप्रसंगी भोर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती धनंजय वाडकर व भोर पंचायत समितीचे उपसभापती रोहन बाठे, मा. जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे ,सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक तुषार माहुरकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष गणेश निगडे ,भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती धनंजय वाडकर, भोर तालुक्याचे युवा नेते अक्षय भैय्या सोनवणे, प्रहार पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते, भोंगवली चे सरपंच अरुण पवार, भगवानराव भांडे, अंकुश राव चव्हाण ,सोसायटीचे चेअरमन जयसिंग तात्या निगडे, बारामती लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे नेते,उपसरपंच महेश धाडवे, नेते मनोज निगडे ,सरपंच विजय गरुड, भोंगवली गावातील ग्रामस्थ विकास सेवा सोसायटी च्या आजी माजी चेअरमन संचालक व पंचक्रोशी परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत रानवारा गार्डन रेस्टॉरंटचे प्रोप्रा. संग्रामराजे भोसले यांनी केले.तर या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले, तर आभार डॉ. संतोष निगडे यांनी मानले
येथे चिकन रस्सा,मटण फ्राय, तसेच मटन भाकरी व विविध प्रकारच्या व्हेज व नॉन व्हेज खाद्य डिशेश आणि मराठमोळ जेवण या रेस्टॉरंटमध्ये असणार आहे.


