समाजासाठी जगणे असणारा नेता ,दिलीप अप्पा बाठे:- ह. भ. प. चैतन्य महाराज वाडेकर

Maharashtra varta

 समाजासाठी जगणे  असणारा नेता ,दिलीप अप्पा बाठे:- ह. भ. प. चैतन्य महाराज वाडेकर.

स्व.दिलीप अप्पा नामदेव बाठे यांचे प्रथम पुण्यस्मरण दिन 



नसरापूर (प्रतिनिधी)

व्यक्तीच्या अंगी असलेली गुणवत्ता, बुद्धीचातुर्याचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी होण गरजेचे आहे. स्वतःसाठी जगणारी माणसं अनेक आहेत. मात्र समाजासाठी जगणारी माणसे हे खरे आदर्श लोकसेवक आहेत. त्यातील भोर तालुक्याच्या समाज राजकारणाच्या  पटलावरती दिलीप अप्पा बाठे  यांचे कार्य आदर्श व  भूषणावह आहे असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे युवा कीर्तनकार ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यांनी केले.


 स्व.दिलीप अप्पा नामदेव बाठे यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनी युवा कीर्तनकार ह  भ. प. चैतन्य महाराज वाडेकर यांचे सुश्राव्य किर्तन संपन्न झाले, त्या कीर्तनात बोलताना चैतन्य महाराज वाडेकर म्हणाले की, तुमची विद्वत्ता स्वतःपुरती असेल तर त्या विद्वत्तेला काडीचीही किंमत नाही. ती विद्वत्ता समाजाच्या उपयोगासाठी आली पाहिजे आता बुद्धीचा पालट धरा हे  महत्त्वाचे आहे.

 स्व.दिलीप अप्पा बाठे  यांना त्यांच्या कार्यास व स्मृतीस अभिवादन व आदरांजली प्रसंगी    भोर ,वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या सुविद्य पत्नी स्वरूपाताई थोपटे, पुरंदर-हवेली चे आमदार संजय जगताप यांच्या पत्नी राजवर्धिनी ताई जगताप,ह. भ. प. नामदेव महाराज किंद्रे,महाराष्ट्र राज्य वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आर. के .रांजणे ,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे  अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, खंडाळा पंचायत समितीचे मा.सभापती राजेंद्र तांबे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मा. संचालक भालचंद्र जगताप,  भोर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश सोनवणे ,भोर पंचायत समितीचे सभापती लहू नाना शेलार,पुणे  जिल्हा परिषदेचे सदस्य विठ्ठल आवाळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते  रवींद्र बांदल,गणेश निगडे ,पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य विक्रम खुटवड, काँग्रेस पक्षाचे नेते माऊली तात्या पांगारे ,युवक अध्यक्ष नितीन दामगुडे,शिवनाना कोंडे ,आबासाहेब यादव , भोर वेल्हा मुळशी विधानसभा युवक अध्यक्ष महेश टापरे ,सारोळ्याचे उपसरपंच महेश धाडवे ,वेल्हे तालुका शिवसेना पक्षाचे मा.अध्यक्ष शैलेश वालगुडे, मनसेचे नेते अप्पा दसवडकर ,विलास बोरगे, टोलनाका हटाव कृती समितीचे निमंत्रक माऊली दारवटकर, ह. भ. प. सुनिल महाराज धुमाळ , राहुल महाराज पारठे,  ह. भ .प .नवनाथ महाराज लिमण,गणेश महाराज भगत  आणि भोर ,वेल्हा व हवेली खंडाळा, पुरंदर ,मुंबई ,कोल्हापूर सांगली ,सातारा या ठिकाणांहून सर्वच क्षेत्रातले  पदाधिकारी ,अधिकारी ,कर्मचारी मान्यवर ,नागरीक, बंधू भगिनी व पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार भोर तालुका वारकरी संप्रदाय चे उपाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी मानले.

(मान्यवरांनी  श्रद्धांजली मनोगतात  सांगितले की,स्व. दिलीप अप्पा बाठे यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनी त्यांच्या कार्याचे  वेध घेत असताना, समाज व राजकारणातील उत्कृष्ट संघटक, सर्व राजकीय पक्षांशी सलोख्याचे संबंध ,जनतेच्या प्रश्नावर गुळमुळीत भूमिका न घेता सडेतोडपणे जनतेचा विचार मांडणारा नेता, सभ्यता संस्कृती आणि मैत्री जपणारे व गुंजवणी पाणी संघर्ष समिती ,शेतकऱ्यांचे विविध आंदोलने, खेड शिवापूर टोल नाका, खेडशिवापुर टोलनाका हटाव कृती समितीत उल्लेखनीय कामगिरी, हजारो गोरगरिबांना तीर्थयात्रा घडवणारा श्रावणबाळ, सर्वसमावेशक नेता सर्व क्षेत्रातील उत्तम जाण व सामाजिक भान जपणारे व धारंबे शिव सृष्टी साठी पुढाकार घेणारे, स्व.दिलीप अप्पा बाठे हे आदर्श व्यक्तिमत्त्व होते. भोर पंचायत समितीचे उपसभापती रोहन बाठे  हे दिलीप आप्पा बाठे  यांचे उर्वरीत  सामाजिक व राजकीय कार्य पुढे चालू ठेवतील,  हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. असे मान्यवरांनी श्रद्धांजली व्यक्त करताना म्हटले)

To Top