......तरच आदर्श समाज उभा राहिल: ह. भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर
अक्षय भैय्या सोनवणे युवा मंच यांच्या वतीने शिवजयंती व तुकाराम बीज कार्यक्रम किर्तन महोत्सवाने संपन्न.
भोर (प्रतिनिधी):-
महाराष्ट्र ही संतांची व छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली ही भक्ती परंपरा आजही अखंडित आहे. या संतांच्या विचारांचा आदर्श व संतांनी घालून दिलेल्या मार्गावर चालणे . आज काळाची गरज झालेली आहे .मुलांच्या एका हातात विज्ञान द्या, तर दुसर्या हातात अध्यात्म दिल्यानंतर सुसंस्कारित मुलं निर्माण होऊन उद्याचे भावी जबाबदार नागरिक तयार होतील.त्यातूनच आदर्श समाज उभा राहील असे प्रतिपादन समाजप्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले.
भोर तालुक्याचे युवा नेते अक्षय भैय्या सोनवणे युवा मंच आयोजित शिवजयंती व तुकाराम बीज निमित्त किर्तन सोहळ्याचं आयोजन न्हावी ता. भोर येथे प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते.
त्यावेळेस इंदुरीकर कीर्तनात बोलताना पुढे म्हणाले की, विज्ञानाबरोबरच अध्यात्म द्या, मंदिराबरोबर शाळा स्वच्छ ठेवा,लग्नातील सत्कार बंद करा, शाळा डिजिटल करा, गाव तंटामुक्त करावे ,गाव सौर उर्जेवर चालावे, शनिवार व रविवार अर्धा तास गावातील मंदिर व शाळा स्वच्छ करा.मोबाईलचा वापर गरजेनुसार करा.
मोबाईल संस्कृती आल्याने आपला धर्म, संस्कृती बुडत चालला आहे.हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन ऐकण्यासाठी भोर आणि वेल्हे ,पुणे परिसरातून शैक्षणिक सामाजिक, राजकीय, सहकार कृषी, क्रीडा, शेतकरी आदी विविध क्षेत्रातले हजारो मान्यवर व नागरिक व महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार युवा नेते अक्षय भैय्या सोनवणे यांनी मानले.
ह .भ .प. निवृत्ती महाराज देशमुख म्हणाले की ,समाजसेवक अक्षय भैय्या सोनवणे यांनी सुरू केलेले समाजकार्य हे कौतुकास पात्र आहे. गोरगरीब वंचितांची सेवा तुम्ही करत आहेत त्या सेवेमध्ये निश्चितपणे ईश्वर आहे. अशीच सेवा तुम्ही करत राहा ईश्वर तुमच्या मदतीला धावून येईल. जनतेचा कृपाशीर्वाद निश्चित पणाने तुम्हाला मिळणारच आहे.
