राज तनपुरे यांनी धांगवडी वि.वि.सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन संचालकांचा, केला सत्कार.
कापूरहोळ( प्रतिनिधी)
भोर कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य राज तनपुरे यांनी भोर तालुक्यातील धांगवडी वि.वि.सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमनपदी रामचंद्र गोविद तनपुरे व व्हा.चेअरमनपदी भरत नामदेव खोमणे, सदस्यपदी शंकर महादेव तनपुरे, सुनील मारुती तनपुरे, .चेतन राजेंद्र तनपुरे, .सुनील कृष्णा तनपुरे, मोहन रघुनाथ पालवे, अरविंद कृष्णा तनपुरे गणपत नारायण तनपुरे, सौ. भरती भाऊसो तनपुरे,.रंजना दिलीप तनपुरे .सुहास बाबुराव मोरे, नारायण नथू देशपांडे यांची निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार करून सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी धांगवडी गावचे मा. सरपंच .नंदूदादा तनपुरे, काँग्रेसचे कार्यकर्ते .सागर करंजकर सा.कार्यकर्ते बाळासाहेब तनपुरे .बंडोपंत तनपुरे, भाऊसो तनपुरे राज तनपुरे यांनी भोर तालुक्यातील धांगवडी वि.वि.सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
भोरचे सहाय्यक निबंधक बाळासाहेब तावरे यांनी निवडीचे काम पाहिले. तसेंच सहाय्यक म्हणून पुरुषोत्तम बाठे सचीव हे होते.
यावेळी ग्रामस्थांनी एकविचाराने बिनविरोध चेअरमन, व्हा.चेअरमन व सर्व सदस्य निवडून देवून चांगला संदेश या निमित्ताने दिला असून नेहमी असे एक दिलाने काम करून शेतक-यांचे व गावच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावावेत.असे विचार भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राज तनपुरे यांनी व्यक्त केले.

