भोर तालुका काँग्रेस पक्षाचे नेते मानसिंग मालुसरे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश.
भोर (प्रतिनिधी):-
भोर तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे नेते मानसिंग बाबुराव मालुसरे व निगडे गावचे सामाजिक कार्यकर्ते दशरथ चिकणे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत भोर तालुक्याच्या राजकारणाला वेगळे वळण देत, अनेकांच्या भुवया यामुळे उंचावले गेले असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे .
पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयात पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश तात्या भेगडे, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस धर्मेंद्रजी खांडरे, पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे नेते बाळासाहेब गरुड ,डोंगरी विकास परिषदेचे सदस्य विश्वासराव ननावरे,भोर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जीवनअप्पा कोंडे,सरचिटणीस संतोष धावले, विनोद चौधरी, हनुमंत बांदल, सुनील पांगारे, पुणे जिल्हा भारतीय जनता पक्ष विद्यार्थी आघाडीचे उपाध्यक्ष निलेश कोंडे तेलवडी गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भरत धावले व भोर तालुका भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
मानसिंग मालुसरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे गुंजवणी खोऱ्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली गेली आहे .
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत, भारतीय जनता पक्षाचे पारडे जड राहण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
पक्ष प्रवेशा नंतर मानसिंग मालुसरे म्हणाले की, मी मागील वीस ते पंचवीस वर्षापासून काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षामध्ये वेळोवेळी सक्रीय राहिलो. विशेष योगदान देत, कामे केली. मात्र माझ्या नेतृत्व व कर्तुत्वाला वाव न दिल्यामुळे आणि सामाजिक प्रश्नांची सोडवणूक न केल्यामुळे मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.आगामी काळात भारतीय जनता पक्षाचे भोर तालुक्यात अधिक ताकद वाढवत संघटन करणार आहे .माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी भारतीय जनता पक्षात सक्रिय राहून लोकसेवेचे काम सुरू ठेवणार आहे.

