श्रीमती अलका सदाशिव पवार यांचे निधन.
नसरापूर( प्रतिनिधी)
भोर तालुक्यातील शिवरे-खोपी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आदर्श प्रगतशील शेतकरी कै. सदाशिव बाळकू पवार यांच्या पत्नी,व आदर्श माता अलका सदाशिव पवार यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या ६० वर्षांच्या होत्या. त्यांच्या अकाली निधनाने पंचक्रोशीतील नागरीकांनी दुःख व्यक्त केले.त्यांच्या मागे दोन मुलगे व एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
श्री. दादासो सदाशिव पवार(अध्यक्ष : नवविकास युवक शेतकरी संघटना महा. राज्य), श्री. काळूराम सदाशिव पवार (मानसी फ्लेक्स, वेळू) यांच्या त्या आई होत.
●दशक्रीया विधी ●
बुधवार, दिनांक ३० मार्च २०२२ रोजी खोपी येथे शिवगंगा नदी तीरी होणार आहे.

