लोकाभिमुख नगरसेविका वृषालीताई चौधरी:- प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

Maharashtra varta

 लोकाभिमुख नगरसेविका वृषालीताई चौधरी:- प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील.

नगरसेविका वृषाली ताई चौधरी यांच्या प्रयत्नातून अग्निशमन केंद्राचे लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न.



वारजे (प्रतिनिधी) 

नागरिकांची असणारी मागणी व आपल्या प्रभागात जनहिताच्या प्रश्नांना बाबत संवेदनशीलता ठेवत, प्राधान्याने प्रश्न सोडवणे हे नगरसेवकाचे काम असते आणि हेच आदर्श काम वारजे-कर्वेनगर  प्रभागाच्या नगरसेविका वृषाली ताई चौधरी यांनी करत गेली अनेक वर्षापासूनची असणारी अग्निशमन केंद्राची मागणी आज पूर्ण झालेली आहे. नगरसेविका वृषालीताई चौधरी यांचे काम लोकाभिमुख असल्याचे गौरवोद्गार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी काढले.

वारजे कॅनल रोड पेट्रोल पंपाजवळ वारजे येथे कै. वसंत राव अर्जुनराव चौधरी अग्निशमन केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला, त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील बोलत होते.

कै. वसंतराव अर्जुन चौधरी अग्निशमन केंद्राचे लोकार्पण सोहळा चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष आमदार कोथरूड भा.ज.पा. यांच्या हस्ते संपन्न झाले .या  कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आमदार भिमराव  तापकीर आमदार खडकवासला, संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, भाजपा नेत्या स्वरदाताई बापट, नगरसेवक दिपक पोटे, सुशिल मेंगडे , संदिप खर्डेकर,पुनित जोशी,भोर पंचायत समितीचे सभापती लहूनाना शेलार, शिवराम मेंगडे , सचिन विष्णू दांगट , बापूसाहेब मेंगडे , किरण बारटक्के, विठ्ठल बराटे,अभिजित धावडे, मारूती किंडरे, हेमंत बोरकर, शैलेश मेंगडे , भाजपा पदाधिकारी , वारजे कर्वेनगर  ग्रामस्थ, प्रभाग मधील सोसायटी पदाधिकारी , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका वृषालीताई चौधरी यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.

नगरसेविका वृषाली चौधरी म्हणाल्या की, मी माझ्या प्रभागामध्ये लोकहितासाठी अनेक विकास कामे केली.जनसेवा करण्याची संधी नागरिकांच्या आशीर्वादामुळे मिळाली. आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रभागांमध्ये विकास कामे झालेली आहे. याचे मला समाधान आहे. आगामी काळात देखील जनसेवा करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.

वारजे गावं महानगरपालिके मध्ये समाविष्ट होऊन 25 वर्षे पूर्ण झाली होती आणि या भागातील नागरिकांना अग्निशमन केंद्राची नितांत गरज होती. त्याला कारण ही तसेच होतं, या भागात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढत होती जसं वारजे शहरीकरण होत होतें तसतसे आगी च्या दुर्घटना ही मोठ्या प्रमाणावर घडतं होत्या, त्यात मुंबई- बेंगलोर महामार्ग याचं भागांतून जातं असल्याने मध्यंतरीच्या काळात या महामार्गावर आगीच्या मोठ्या दुर्घटना घडल्या. आगीचा बंब येण्यासाठी चार ते पाच किलोमीटर अंतर असल्याने वित्त व मनुष्य हानी मोठ्या प्रमाणात होतं होती .आदर्श नगरसेविका वृषाली दत्तात्रय चौधरी यांनी वेळोवेळी या विषयावर पाठपुरावा केला. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन केंद्र ज्या जागेवर आरक्षित होते प्रभाग क्रमांक 32 येथील जागा ही न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे हा विषय प्रलंबित आहे असे उत्तर देण्यांत आलें. या विषयांची गंभीर दखल घेऊन नगरसेविका वृषाली दत्तात्रय चौधरी यांनी तातडीने आपल्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक 31 येथील स.न.130कॅनॉल रोड पेट्रोल पंप च्या मागे असलेल्या  आरक्षित जागेवर मान्यता मिळवून महापौर मुरलीधर मोहोळ व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे यांनी महत्वपूर्ण मदत केली व भरघोस निधी देखील दिला आणि हा प्रकल्प एक वर्षांत पूर्ण केला. हा प्रकल्प राबविताना खुप अडचणी उद्भवल्या त्यावर खंबीर पणे मात करत हा प्रकल्प पूर्ण केला. त्यामुळे वारजे कर्वेनगर प्रभागात वृषालीताई चौधरी  यांच्या प्रत्येक विकास कामांचे विशेष कौतुक होत आहे.

To Top