No title

Maharashtra varta

 भोर विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी महेश  टापरे



 नसरापूर  (प्रतिनिधी) : 

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भोर, वेल्हा व मुळशी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी महेश टापरे हे बिनविरोध निवडून आले आहेत.

गेली अनेक वर्षे युवक काँगेसच्या आंदोलनातून पक्षाची भूमिका मोठ्या तडफेने मांडणारे प्रभावशाली नेतृत्व म्हणून महेश टापरे यांच्याकडे पाहिले जाते.

काँग्रेस पक्ष्याच्या माध्यमातून महेश टापरे हे सक्रिय असून, आतापर्यंत झालेल्या पक्षाची विविध आंदोलने, निवडणुका यामध्ये महेश टापरे यांचे विशेष योगदान आहे.

यावेळी माजी मंत्री अनंतराव थोपटे, आमदार संग्राम थोपटे यांनी महेश टापरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी महेश टापरे यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

To Top