शाळा व्यवस्थापन समिती सक्षम करावी : केंद्रप्रमुख कोठावळे
भोर तालुक्यात शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण उत्साहात संपन्न.
भोर :-(प्रतिनिधी):-पत्रकार पवार सर.
शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण झाल्यास शैक्षणिक गुणवत्ता वाढीला चालना मिळेल, असे प्रतिपादन आंबाडे केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे यांनी केले.
दि. 10 मार्च ते 11 मार्च 2022 रोजी दोन दिवसीय आंबाडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण संपन्न झाले.
याप्रसंगी उभारलेल्या शैक्षणिक विचारमंच कोपरा उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
'पालकांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेतच घालावे', असे आवाहन रेखा रांजणे यांनी केले.
'पालक, विद्यार्थी, शिक्षक या तीन दुव्यांमध्ये समन्वयच मुलांच्या शैक्षणिक प्रगती साधण्यामध्ये उपयोगी ठरणार आहे', असे प्रतिपादन मनोज खोपडे यांनी केले.
शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी मुलांच्या कलागुणांचे कौतुक केले .
वर्षभरात विविध क्षेत्रांत विशेष नैपुण्य मिळविलेले विद्यार्थी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
बीट स्तरीय इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या स्पर्धकांनी या वेळी आपल्या कलांचे सादरीकरण केले.
या प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक संजय पवार व माधुरी खपाटे यांनी मार्गदर्शन केले.
सुनील खोपडे यांनी प्रास्ताविक केले. राजू कारभळ यांनी सूत्रसंचालन केले.बापू जेधे यांनी आभार मानले.
केंद्र प्रमुख कोठावळे म्हणाल्या की, 'शाळा व्यवस्थापन समिती ही प्रत्येक गावातील महत्त्वाची समिती असून तिचे सक्षमीकरण झाले तर गावातील शाळेच्या गुणवत्ता वाढीला नक्कीच चालना मिळेल. शिक्षकांनी आपली मार्गदर्शकाची भूमिका चोख बजावण्यात कोठेही कमी पडू नये.'
