कोविड काळात "स्वानंदी शिक्षण विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचेसाठी महावरदान:- केंद्रप्रमुख प्रभावती कदम - कोठावळे

Maharashtra varta

 कोविड काळात "स्वानंदी शिक्षण विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचेसाठी महावरदान:- केंद्रप्रमुख प्रभावती कदम - कोठावळे.


भोर  (प्रतिनिधी)

कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थिती मध्ये मुलांचे अध्ययनासाठी अवधान स्थिर ठेवणे, एकाग्रता राखणे, संतुलन स्थिर ठेवणे व उचित उद्दिष्टापर्यंत पोहचवणे, यासाठी भोर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी  सोनवणे  यांनी सुरु केलेले ' स्वानंदी शिक्षण विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्यासाठी महावरदान' ठरले आहे. असे प्रतिपादन आंबाडे केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ. प्रभावती कदम-कोठावळे यांनी केंद्राच्या शिक्षण परिषदेमध्ये केले.

शिक्षण परिषदेमध्ये  भिमराव शिंदे व महादेव बदक यांनी अध्ययन स्तर सद्यस्थिती यांविषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विठ्ठल आखाडे सर  यांनी केले.

यावेळेस माधुरी घाटे, रुपाली देशमाने, रवींद्र थोपटे, बापू जेधे, मखरे, घोलप, खोपडे, जयश्री  घोडके, महांगरे, रांजणे, क्षीरसागर, राजू कारमळ,संजय पवार,भारती, वाघमारे, सावले, घाडगे, कोदी, सवने, बड़े,  आवारी, खपाटे, गायकवाड आदि शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते.

To Top