वेळू येथे उद्या 7 कोटींच्या विविध विकास कामांचे भव्य उद्घाटन व भूमिपूजन समारंभ.

Maharashtra varta

 वेळू येथे उद्या 7 कोटींच्या विविध विकास कामांचे भव्य उद्घाटन व भूमिपूजन समारंभ.



वेळू (प्रतिनिधी ):-

वेळू ता. भोर येथे उद्या दिनांक 10 फेब्रुवारी 2022 रोजी सायं. 6 वाजता  सात कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भव्य उद्घाटन व भूमिपूजन समारंभ भोर, वेल्हा, मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते संपन्न होत आहे, अशी माहिती भोर तालुका काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष व आदर्श माजी सरपंच ज्ञानेश्वर माऊली पांगारे  यांनी दिली.


त्यासाठी भोर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच पुणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित राहणार आहे.


या विविध विकासकामांच्या उद्घाटन व भूमिपूजनात गार्डन, स्मशानभूमी सुशोभीकरण व संरक्षण भिंत ,घंटागाडी ,वेळू माळवाडी रस्ता कॉंक्रिटीकरण, फिल्टर प्लांट ,केळकर कंपनी रस्ता व साकव , घनकचरा व्यवस्थापन, वेळू गोगलवाडी रस्ता डांबरीकरण ,ड्रेनेज लाईन शिंदे मळा ला जाणारा रस्ता डांबरीकरण आदी कामे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ होणार आहेत.अशी माहिती सरपंच अप्पा धनावडे यांनी दिली.



To Top