विशाल बंटी शेठ कोंडे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न

Maharashtra varta

 विशाल ऊर्फ बंटी शेठ कोंडे  यांची समाज व राजकारणातील वाटचाल दमदार :-आमदार संग्राम थोपटे.


नसरापूर (प्रतिनिधी) :-

भोर तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रभावीपणे काम अल्पावधीत करणारे केळवडे गावचे  विशाल उर्फ बंटी शेठ कोंडे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

विशाल उर्फ बंटीशेठ  कोंडे  हा अल्पावधीतच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून समाज आणि राजकारणामध्ये दमदार वाटचाल करत आहे. उद्याचे त्याचे भविष्य उज्वल असेल असे प्रतिपादन भोर वेल्हा मुळशीचे  आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले.

भोर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल ऊर्फ बंटी शेठ कोंडे  यांचा वाढदिवस केळवडे येथे  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेस आमदार संग्राम थोपटे म्हणाले की,भोर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल उर्फ बंटी शेठ कोंडे यांचे नाव अल्पावधीतच नावारूपाला आले . लोकहिताचे प्रश्‍न समजावून घेत,युवकांच्या अडीअडचणी व विविध सामाजिक उपक्रम राबवणारा  मित्र  ही भावना शिवगंगा खोऱ्यामध्ये युवकांच्या मनात बंटीशेठ बद्दल निर्माण झाली आहे.विशाल कोंडे यांच्या आगामी वाटचालीसाठी आमदार संग्राम थोपटे यांनी शुभेच्छा देत सत्कार केला.

या वाढदिवसाच्या प्रसंगी भोर ,वेल्हे आणि  मुळशी तालुक्यातील तसेच पुणे शहरातील विविध पक्षातील पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विविध गावचे सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य बहुसंख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या .या वाढदिवस समारंभा प्रसंगी महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय रिल्स स्टार्स यांची विशेष उपस्थितीमुळे नागरिकांची प्रचंड गर्दी होती.

या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार विशाल ऊर्फ बंटी शेठ कोंडे मित्र परिवार यांनी मानले.



To Top