स्वानंदी शिक्षण महत्वाचे :-केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे

Maharashtra varta

 स्वानंदी शिक्षण महत्वाचे :-केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे.


अनंत नगर येथे आळंदे केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न.



राजगड  (प्रतिनिधी) :-

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढ व विकासासाठी स्वानंदी शिक्षण महत्त्वाचे आहे, भोर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे  यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम तालुक्यात राबवला जात आहे. स्वानंदी  शिक्षणातील प्रत्येक बाबींवर शिक्षकांनी निर्धारित लक्ष देऊन, प्रत्येक कृती कार्यक्रम शाळास्तरावर प्रभावीपणे राबवला जात असून, त्यामध्ये आणखी सुधारणा  असणे गरजेचे आहे,मराठी व इंग्रजी वाचन उपक्रम 100 दिवसाचे नियोजन शाळेत व्यवस्थित रित्या करून दैनंदिन वाचन उपक्रमात विद्यार्थ्यांचा कृती युक्त व शाब्दिक सहभाग घ्यावा.त्यासाठी शालेय पूरक साहित्याचे वापर करून विद्यार्थी अध्ययन स्तर  वाढवावा,सहज सोपे, जोडाक्षरयुक्त  शब्द विद्यार्थी सहजपणे वाचतील अशी तयारी शिक्षकांनी करून घ्यावी असे प्रतिपादन आळंदे केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे यांनी केले.

 आळंदे केंद्राची शिक्षण परिषद अनंतनगर येथे संपन्न झाली,   

यावेळेस अनंतनगर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल मालुसरे,उपसरपंच तुषार मालुसरे ,राजगड कारखान्याचे भिलारे , कुंभार सर,उपस्थित होते.आळंदे केंद्रातील सर्व शाळातील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

राजगड सहकारी साखर कारखान्याचे चीफ केमिस्ट मधुकर सोलंकर यांनी संपन्न होत असलेल्या प्रशिक्षणास शुभेच्छा दिल्या.

या शिक्षण परिषदेत मराठी व इंग्रजी  माहेवार वाचन,अध्ययन स्तर उपक्रम,रीड टू मी अँप, याबाबत मार्गदर्शन दत्तमंदिर शाळेच्या शिक्षिका रूपाली सरपाले  व सुरेखा मोकाशी यांनी केले.

जिल्हा स्तरावर सामान्य ज्ञान  स्पर्धेत आळंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा ऋग्वेद सुर्वे यांचा दुसरा क्रमांक आल्याबद्दल त्याला मार्गदर्शन करणारे आळंदे शाळेतील शिक्षक विष्णू बाठे यांचा सन्मान केला, तर आळंदे हे गावात  BLO चे काम उत्कृष्ट केल्याबद्दल  माधुरी राजेशिर्के यांचा नुकताच प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या हस्ते आदर्श सन्मान करण्यात आला, त्यांचा देखील सत्कार या वेळेस करण्यात आला. तसेच ओसरीवरची शाळा उपक्रम प्रभावीपणे राबवल्या बद्दल दत्त मंदिर शाळेच्या शिक्षिका रूपाली सरपाले व मोकाशी मॅडम यांचा सत्कार  केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे कदम यांच्या हस्ते करण्यात आला.

 उपस्थित स्वागत अनंतनगर मुख्याध्यापक सुरेखा सोंडकर यांनी केले तर

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल  पवार यांनी केले ,उपस्थितांचे आभार रजनी राऊत यांनी मानले.

To Top