बाळासाहेब किसन वाडकर यांचे निधन.
नसरापूर ( प्रतिनिधी)
भोर तालुक्यातील वेळू येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आदर्श प्रगतशील शेतकरी बाळासाहेब किसन वाडकर यांचे वयाच्या 55 वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
वेळू पंचक्रोशीमध्ये प्रेमळ ,हरहुन्नरी व मनमिळावू व मितभाषी स्वभावाने ते सर्वदूर परिचित होते.वेळू गावच्या सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत बाळासाहेब वाडकर यांचा मोलाचा वाटा व सहभाग होता.
बाळासाहेब वाडकर यांच्या निधनाची वार्ता समजताच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे व पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी वाडकर यांच्या कुटुंबास भेट देत सांत्वन करत, दुःख व्यक्त केले.
त्यांच्या मागे दोन मुली ,एक मुलगा असा परिवार आहे.
पुणे महानगरपालिकेचे कात्रज परिसराचे आदर्श नगरसेवक व पुणे शहराचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांचे ते मेहुणे होत.
त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दि. 31 जानेवारी 2022 रोजी वेळू येथे होणार आहे.
●जाहिरात दशक्रिया विधी●
