अ.भा.फार्मासिस्ट असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी प्रा, फार्मासिस्ट महेश अशोक मराठे यांची निवड.

Maharashtra varta

 अ.भा.फार्मासिस्ट असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी प्रा, फार्मासिस्ट महेश अशोक मराठे यांची निवड.


पुणे ( प्रतिनिधी)

 अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या  महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी प्रा. महेश अशोक मराठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे,

 फार्मासिस्ट क्षेत्रांमधील फार्मासिस्ट वर होणार अन्याय दूर व्हावा व त्यांना न्याय कसा मिळवता येईल यासाठी त्यांनी पश्चिम महाराष्ट्र विभागातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची धडपड चालू होती व  करोना  काळामध्ये  सामाजिक बांधिलकी जपत यांनी आपले कर्तव्य बजावले आहे त्यांचे हे कार्य बघून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.दत्ता खराटे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ.पंकज चौधरी,प्रदेश सचिव रोहित वाघ यांच्या शिफारशीनुसार व सर्वांच्या एकमताने करण्यात आली त्यांची ही निवड करण्यात आली आहे.

ही निवड होताच त्यांच्यावर विविध शैक्षणिक,अध्यात्मिक व राजकीय  क्षेत्रामधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्राचार्य पानस्कर सर विदर्भ विभाग कार्यकारणी प्राध्यापक विदर्भ विभाग कार्यकारणी सदस्य वैभव नरवाडे , प्रा. महेश ठाकरे सर विदर्भ विभाग कार्यकारणी सदस्य व प्रा फार्मासिस्ट विशाल रावशे यांनी पण त्यांचे कौतुक केले आहे .येणाऱ्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्र विभागातच नाहीतर पूर्ण महाराष्ट्र मध्ये फार्मासिस्टच्या येणार्‍या विविध अडचणी प्रा. फार्मासिस्ट महेश अशोक मराठे हे सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष दत्ता खराटे,प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर पंकज चौधरी व सचिव रोहित वाघ प्रदेश सहसचिव महादेव मुंडे प्रदेश कार्याध्यक्ष नासीर पठाण राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर पायघन व सोशल मीडिया प्रमुख प्रा. अविनाश ढोबळे  यांनी व्यक्त केला आहे



 

To Top