इंगवली प्राथमिक शाळेचे काम उत्कृष्ट :-महेश शेंडकर.

Maharashtra varta

 इंगवली प्राथमिक शाळेचे काम उत्कृष्ट :-महेश शेंडकर.



नसरापूर (प्रतिनिधी)

पुणे जिल्हा परिषदेने गुणवत्ता वाढीचे सुचवलेले दहा कलमी कार्यक्रम या  बाबत पूरक उपक्रम तसेच स्वानंदी शिक्षण व त्याबाबतची प्रभावीपणे अंमलबजावणी इंगवली प्राथमिक शाळेमध्ये विशेषत्वाने पाहण्यास मिळाली. एकंदरीत इंगवली शाळेचा गुणवत्तेचा दर्जा अधिक चांगला आहे असे प्रतिपादन डाएट पुणेचे अधिव्याख्याते महेश शेंडकर यांनी केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगवली येथे डाएट पुणेचे अधिव्याख्याते महेश शेंडकर व पुरंदर पंचायत समितीचे विषय तज्ञ बापूसाहेब शिरसाट यांनी इंगवली शाळेस भेट दिली, त्या वेळेस अधिव्याख्याते शेंडकर बोलत होते. 


भेटीदरम्यान शाळेत सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे . महेशजी शेंडकर यांनी  कौतुक केले. या भेटीनिमित्त शेंडकर आणि  शिरसट यांचा इंगवली शाळेचे  मुख्याध्यापक दलवाई सर यांनी शाल आणि श्रीफळ भेट देत सन्मान केला. 

यावेळी उपशिक्षक संदिपआप्पा जगताप आणि प्रशांत भारती हे उपस्थित होते.


(शाळेचे मुख्याध्यापक दलवाई सर यांनी सांगितले की,भोर  पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे- केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आळंदे केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे -कदम यांच्या नेतृत्वाखाली इंगवली शाळेने शैक्षणिक उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करून वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन आम्हाला सातत्याने मिळत आहे.)
To Top