विठ्ठल भिवा बांदल यांचे निधन.

Maharashtra varta

                विठ्ठल भिवा बांदल यांचे निधन.


नसरापूर( प्रतिनिधी)

भोर तालुक्यातील दिडघर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आदर्श प्रगतशील शेतकरी विठ्ठल भिवा बांदल यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले .ते 75 वर्षांचे होते. पंचक्रोशीमध्ये प्रेमळ ,हरहुन्नरी व मनमिळावू व मितभाषी स्वभावाने सर्वदूर परिचित होते.  त्यांच्या अकाली निधनाने नसरापूर पंचक्रोशीतील नागरिकांनी दुःख व्यक्त केले.

दशक्रिया विधी बुधवार (दि. २) फेब्रुवारी 2022 रोजी राहत्या घरी दिडघर येथे  होणार आहे.त्यांच्या मागे तीन मुलगे ,सुना नातवंडे असा परिवार आहे.

दिडघर येथील प्रसिध्द राजतोरण मिसळ हाऊसचे मालक संतोष बांदल, सचिनअण्णा बांदल, व नितीन बांदल यांचे ते वडील होत. तर विरवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच ज्योती सचिन बांदल यांचे ते सासरे होत.



To Top