भोर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची गुणवत्ता उत्तम :-सभापती लहू नाना शेलार .
भोरमधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार .
नसरापूर , ता. 25 :
भोर पंचायत समिती विकास गटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे भोर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची गुणवत्ता दर्जेदार व उत्तम असल्याचे सूचित करत असल्याचे प्रतिपादन भोर पंचायत समितीचे सभापती लहुनाना शेलार यांनी काढले.
भोरमधील राजा रघुनाथराव विद्यालयात पंचायत समिती आणि भोर तालुका केंद्रप्रमुख संघटनेच्या वतीने तालुक्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
सभापती शेलार बोलताना म्हणाले की,कोरोनाच्या या काळात शिक्षणाबाबत प्रतिकूल परिस्थिती असताना देखील भोर तालुक्यात शिष्यवृत्ती मध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे. भोर पंचायत समिती शिक्षण विभाग हा चांगले काम करीत आहे.
या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे- केळकर, भोर एज्युकेशन सोसायटीचे सचिव विकास मांढरे, केंद्रप्रमुख संघटनेच्या अध्यक्षा अंजना वाडकर, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुदाम
ओंबळे, पंडित गोळे, मुख्याध्यापक दीपक शिवतरे, प्रभावती कोठावळे, धनाजी नाझिरकर, सुषमा पाटील, कौशल्या पवार, एस. के. रणदिवे,शिक्षक नेते महेंद्र अप्पा सावंत व संजयराव पवार सर आदी उपस्थित होते.
यावेळी भोर तालुक्यातील इयत्ता पाचवीच्या परिक्षेत शिष्यवृत्ती मिळविलेल्या २८ आणि इयत्ता सातवीच्या परिक्षेत शिष्यवृत्ती मिळविलेल्या विद्यार्थ्याचा ८ पालकांसह सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शैक्षणीक साहित्य व खाऊ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शिक्षक विठ्ठल दानवले यांनी सूत्रसंचालन केले. केंद्रप्रमुख अंजना वाडकर यांनी आभार मानले.
भोर तालुक्याचा शिष्यवृत्ती पॅटर्न राज्यभरात ओळखला जाणार:-
" कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे आणि ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल व इंटरनेटची सुविधा अपुरी असल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत कमी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. शिक्षक व पालकांच्या सहकार्याने आगामी वर्षात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी भोर तालुक्यातीचे असतील," हा शिष्यवृत्तीचा पॅटर्न राज्यभर ओळखला जाईल, अशा पद्धतीचे प्रयत्न व काम आगामी काळात करणार असल्याचे सूतोवाच भोर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे केळकर यांनी व्यक्त केला.")
पत्रकार पवार सर.
