पुण्यातील शिक्षकांच्या समायोजन बदल्यांना ब्रेक.

Maharashtra varta

 पुण्यातील शिक्षकांच्या समायोजन बदल्यांना ब्रेक.

अवकाळी बदल्यांवरील नाराजीमुळे शासनाकडून दखल.


बारामती( प्रतिनिधी)

पुणे महानगरपालिका व बारामती नगरपरिषद हद्दवाढ गावांतील ५८६ शिक्षकांच्या समायोजन बदल्या स्थगित करण्याचे आश्वासन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली

                  

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमधील कागल येथील निवासस्थानी राज्याचे ग्रामविकासमंत्री मा.हसन मुश्रीफ यांची भेट घेण्यात आली, पुणे महानगरपालिका व नगरपालिका हद्दवाढ झालेल्या गावातील शिक्षकांचे शाळांसह वर्गीकरण करण्यात यावे यासाठी २५ जुलै २०१९च्या शासन निर्णयात दुरुस्ती करणेत यावी व तोपर्यंत पुणे जिल्हा परिषदेने सुरू केलेली समायोजन प्रक्रिया तातडीने स्थगित करण्यासाठी जिल्हा परिषदेला लेखी आदेश देण्यात यावेत अशी मागणी ग्रामविकास मंत्री मा.हसन मुश्रीफ  यांच्याकडे करण्यात आली


आगामी जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली, बदली प्रक्रिया गतिमान करून विस्थापित शिक्षकांना न्याय दिला जाईल, आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी शिक्षक संघासोबत स्वतंत्र बैठक बोलावून संघाच्या शिफारशी स्वीकारण्यात येतील असे आश्वासन ग्रामविकास मंत्री यांनी दिले


यावेळी राज्यसंघाचे नेते संभाजीराव थोरात, राष्ट्रीयअध्यक्ष एन.वाय.पाटील, पुणे जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, राज्य संपर्क प्रमुख एस.व्ही.पाटील, पुणे जिल्हा संघाचे नेते राजेंद्र जगताप, राजेश काळभोर, रमेश मारणे, राजेश राऊत,रमेश कुंजीर चंद्रकांत जगताप यांच्यासह शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते


२७ जानेवारीला प्राथमिक चर्चा

         बदली प्रक्रिया गतिमान करणे व आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी शरद पवार यांच्या सूचनेनुसार राज्य सरकार व शिक्षक संघाची संयुक्त बैठक होणार असून या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास २७ जानेवारी रोजी मुंबई येथे बोलाविले आहे

To Top