भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी यांचा विशेष सत्कार.

Maharashtra varta

 भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी यांचा विशेष सत्कार.


भोर (प्रतिनिधी):-

भोर पंचायत समिती विकास गटातील शाळांमध्ये "स्वानंदी शिक्षण" या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं स्वप्न पुर्ती आज प्रत्यक्षात दिसत आहे. भोर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी सुरु केलेल्या स्वानंदी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शारीरिक ,मानसिक आरोग्य सुदृढ राहावं, त्यातून अध्ययनासाठी विद्यार्थी तयार व्हावेत यातूनच शिक्षण सहेतुक होऊन विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व सर्जनशीलतेने फुलून येणार आहे. त्यातून विद्यार्थी अभिव्यक्तीच्या माध्यमातून ज्ञान घेऊन या देशाचे जबाबदार नागरिक तयार होतील, असे प्रतिपादन पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष पोपटराव निगडे यांनी केले

भोर पंचायत समिती कार्यालयात भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे -केळकर यांचा सन्मान नुकताच करण्यात आला, यावेळेस कार्याध्यक्ष पोपटराव निगडे बोलत होते.

भोर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांना नॅशनल अवार्ड फॉर इनोवेशन अँड गूड प्रॅक्टिसेस इन एज्युकेशनल हा पुरस्कार  मिळाल्या बद्दल भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळेस पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष पोपटराव निगडे, शिक्षक नेते चांगदेव नाना मसुरकर, महेंद्र अप्पा सावंत, पंडित गोळे, भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुदामराव ओंबळे, सरचिटणीस विजयकुमार थोपटे, बापू जेधे,दत्तात्रय पांगारे ,तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला नेत्या तृप्ती पांगारे, विजया झगडे, अधीक्षक राजीव एकबोटे, सुजाता दळवी आदी उपस्थित होते.

(कोरोना काळात भोर पंचायत समिती विकास गटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन अखंडपणे शिक्षण सुरू होते. याबाबत गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी प्रभावीपणे मार्गदर्शन करत विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी संविधान मूल्ये पत्रिका  तसेच स्वानंदी शिक्षण कृती पत्रिकेचा अवलंब करत, विद्यार्थी यांना अध्ययनामध्ये सातत्यपणा आणण्यासाठी विशेष असं काम केलं गेल आहे. हा पुरस्कार म्हणजे त्याच्या कामाची पोचपावती आहे. असे विचार भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुदामराव ओंबळे यांनी मांडले.)

To Top