आजी माजी आमदारांच्या लक्ष लागलेल्या प्रभागात प्रहार घेणार एन्ट्री...

Maharashtra varta

 आजी माजी आमदारांच्या लक्ष लागलेल्या प्रभागात प्रहार घेणार एन्ट्री...

संदीप नवले यांच्या कामामुळे प्रस्थापितांना धास्ती.




वाघोली:-(प्रतिनिधी):-(विठ्ठल पवार.)

प्रभाग क ६ अदूगर प्रभाग ५ म्हणून ओळखला जायचा,वॉर्ड रचना नंतर प्रभाग अर्धा भाग प्रभाग ७ कल्याणी नगर प्रभाग ७मध्ये  गेला, भारतीय जनता पार्टी चा प्रभाग ६ हा बालेकिल्ला आहे, 4 ही  नगरसेवक भारतीय जनता पार्टी चे आहेत, या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे .मात्र प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस संदीप नवले यांनी मागील काळात केलेल्या सामाजिक कार्यामुळे गोरगरिबांच्या तसेच अंध, अपंग निराधार, मजूर, कामगार यांच्या मनात संदीप नवले यांचे काम ठसले आहे. त्यामुळे या प्रभागात संदीप नवले यांच्या रूपाने तगडे आव्हान प्रस्थापितां समोर असणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रभागात महाविकास आघाडी ची चर्चा चालू आहे. प्रहार जनशक्ती पक्ष निवडणुकीला सामोरे जात असल्या मुळे महाविकास आघाडी मध्ये स्थान मिळेल अस तरी सध्या दिसून येत नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.आजी ,माजी आमदार  अथवा वर्चस्व असलेला पक्ष असलेले नगरसेवक  गड जिंकतील, का?

यात प्रहार जनशक्ती पक्ष  यात बाजी मारेल ?हे  पाहण्यासारखं चित्र इथे दिसून येते आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस संदीप देविदास नवले ही ह्या प्रभागात प्रहार जनशक्ती पक्ष कडून इच्छुक आहे, संदीप नवले हे वडगाव शेरी मतदार संघाचे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख पद त्यांच्याकडे असून ते सध्या चांगल्या पद्धतीने काम करीत असल्याचे दिसून येत आहे .नवले गेली अनेक वर्ष पासून समाजसेवेत कार्यरत आहे, कोरोना काळात दररोज १००० लोकांना जेवण,७०० लोकांना अन्नधान्य चे किट वाटप करणे,पुणे मध्ये हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन चा तुटवडा होत असल्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणे, अखंडपणे रुग्ण सेवा, अपंग लोकांसाठी महानगरपालिका वर आंदोलन करणे,राज्यमंत्री  बच्चू भाऊंचे विचार घेऊन  गरीब, अनाथ,अपंग  निराधार लोकांसाठी सातत्याने झटत असतात,नवले यांच्या कामास दिवसेंदिवस लोकप्रियता मिळत आहे.  या प्रभागात राज्यमंत्री  बच्चुभाऊ कडू यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग व मतदार आहे. नवले यांचे लोकाभिमुख काम करण्याच्या  पद्धतीमुळे  प्रभागात वार बदलण्याची चिन्ह आहेत,  गरीब ,गरजू,वंचित लोकांच्या मदतीला धावून जात असल्यामुळं सामान्य कुटुंब मधील मत त्यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे,

To Top