कांबरेश्वर युवा प्रतिष्ठान चा शिव सप्ताह उपक्रम स्तुत्य :-आमदार संग्राम थोपटे.
शिव सप्ताहाचे आयोजन करणारे भोर तालुक्यातील पहिलेच गाव "कांबरे खे.बा".
नसरापूर (प्रतिनिधी):-
कांबरेश्वर युवा प्रतिष्ठान कांबरे खे .बा. ने गेली 3 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून सुरू केलेल्या "शिव सप्ताह" हा उपक्रम समाजाला दिशा आणि प्रेरणा देणारा आहे. भोर तालुक्यातील हा आगळावेगळा उपक्रम आहे. शिव सप्ताहाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन होऊन तरुण पिढीच्या मनावर ते संस्कार बिंबवण्याच काम या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन भोर वेल्हा मुळशी चे आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
कांबरे खे.बा. तालुका भोर येथे कांबरेश्वर युवा प्रतिष्ठानने 14 फेब्रुवारी 2022 ते 19 फेब्रुवारी 2022 पर्यंत शिव सप्ताह चे आयोजन केले आहे. शिव सप्ताह च्या चौथ्या दिवसाच्या उपक्रमानिमित्त भोर वेल्हा मुळशी चे आमदार संग्राम थोपटे बोलत होते.
या शिव सप्ताह मध्ये शिवव्याख्याते संतोष महाराज तोत्रे यांचे व्याख्यान, अशोक मुजुमले यांचा पोवाडा ह. भ. प. नवनाथ महाराज लिमन यांचे कीर्तन असे कीर्तन व भारुडाचा कार्यक्रम सप्ताहामध्ये संपन्न होत आहे.
या कार्यक्रमासाठी राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक पोपटराव सुके, दिलीप कोंडे, भोर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश सोनवणे भोर पंचायत समितीचे उपसभापती रोहन बाठे, भोर तालुका काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली पांगारे ,भोर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल उर्फ बंटी कोंडे, भोर तालुका काँग्रेस पक्षाचे नेते अशोक वाडकर, उद्योजक जितेंद्र कोंडे, पुण्याचे युवा नेते चेतन शेठ मांगडे, सरपंच तुषार कांबळे, शिवाजी कामठे, पंकज तनपुरे ,अभिजित पवार, विविध गावचे सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर व कांबरे ग्रामस्थ ,नागरिक व कांबरेश्वर युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .
इतर या अगोदरच्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे,पंचायत समिती सभापती लहू नाना शेलार, भाजपाचे अध्यक्ष जीवन कोंडे , सरपंच बाबी गाडे, अमोल शिळीमकर, नितीन इंगुळकर, सचिन कोंडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.
संध्याकाळी नऊ ते अकरा या वेळेत जुगलबंदी कीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. मुक्ताबाई चाळक व उन्नती तांबे यांचे सुश्राव्य किर्तन संपन्न झाले.
( गेली तीन वर्ष कांबरे खे.बा. तालुका भोर येथे शिवजयंती कार्यक्रमाचे औचित्य साधून शिव सप्ताहाचे आयोजन केले जात आहे. भोर तालुक्यातील कांबरे खे. बा. हे पहिलेच गाव असेल ,की ज्या ठिकाणी शिव सप्ताहाच्या माध्यमातून तरुणांच्या, नागरिकांच्याविद्यार्थी यांच्या मनावर ती शिव संस्कार रुजविण्याचे काम केले जात आहे,विषेश म्हणजे कांबरेश्वर युवा प्रतिष्ठान मध्ये अध्यक्ष,उपाध्यक्ष कार्यकारणी नाही, प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते सहकार्याने सामाजिक कार्यक्रम संपन्न करीत आहेत.)
