भोर मधील zp शाळांत इंग्रजी विषयाची गुणवत्ता वाढणार:-
गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे.
भोरमध्ये केंद्र स्तरावर इंग्रजी अध्ययन स्पर्धा संपन्न.
भोर (प्रतिनिधी):-
इंग्रजी विषयाची गुणवत्ता वाढावी. श्रवण, भाषण, वाचन, लेखन व संभाषण या कौशल्याचा विकास व्हावा म्हणून पाठ्यक्रमातील कविता, कथा, wh प्रश्न, नाट्यीकरण, शब्द संपत्ती यांचा सराव व्हावा म्हणून कालबद्ध स्पर्धात्मक इंग्रजी अध्ययन समृद्धी उपक्रम सुरू केला आहे असे प्रतिपादन भोर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे- केळकर यांनी केले.
भोर पंचायत समिती विकास गटातील केंद्र स्तरावर इंग्रजी अध्ययन स्पर्धा संपन्न झाल्या. त्या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी गटशिक्षणाधिकारी सोनवणे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की,स्पर्धेचे स्वरूपाप्रमाणे विद्यार्थी व शिक्षक याबाबत जास्त तयारी करतील. विद्यार्थ्यांचा सराव करून घेतील. इंग्रजी अध्ययन बाबत भोर मध्ये अधिक यश मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
भोर तालुक्यातील आंबाडे व आळंदे केंद्रातील इंग्रजी अध्ययन स्पर्धा संपन्न झाली.
इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये अधिकाधिक सहभाग नोंदवत आंबाडे केंद्राच्या स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाल्या असे प्रतिपादन केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे- कदम यांनी केले .
अंबाडे केंद्राचे केंद्रप्रमुख व पुणे जिल्हा केंद्र संघटनेच्या कार्याध्यक्ष प्रभावती कोठावळे -कदम यांनी स्पर्धेचे नियोजन सुव्यवस्थितरित्या केले होते.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मखरे अभिजीत, अनिल महांगरे, मंगल घोलप, संदीप घाडगे, संपत रांजणे ,रूपाली कोळी, भारती गरुड, मोहिनी गायकवाड ,वाघमारे तुळशीराम, बडे छाया, जयश्री घोडके, अमर क्षिरसागर ,बापू जेधे,महादेव बदक ,रवींद्र थोपटे, रूपाली देशमाने ,उषा गोरड, रत्नमाला थोपटे, शिवाजी खोपडे, राजू कारभळ, खंडू घोलप ,गिरीगोसावी उज्वला ,सावले ,आनंदा, खपाटे माधुरी ,अंजना कोंढाळकर आदी शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.
