प्रहारचे गौरव जाधव यांनी केले डोळ्याला दिसेल असे काम.
15 नागरीकांच्या मोफत नेत्रबिंदू शस्त्र क्रिया.
सातारा (प्रतिनिधी):-
राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली यांचे स्वीय सहाय्यक गौरव जाधव यांच्या सहकार्याने क्षेत्रमाहुली मधील 15 नागरिकांना मोफत नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.
क्षेत्रमाहुली गावातील सुमारे १५ लोकांच्या डोळ्यावरील मोतीबिंदू वरील शस्त्रक्रिया H.V.देसाई डोळ्याचे हॉस्पिटल पुणे येथे मोफत दुसरा कॅम्प घेण्यात आला. तपासणी करीता हॉस्पिटल मध्ये सर्व रुग्णांना आणण्यात आले होते.आज त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
सदर शस्त्रक्रिया कॅम्प घेण्याकरिता सौ.सावंत मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.सोबतच डॉ.सय्यद मामा (सह्याद्री ऑप्टिकल सातारा ) यांनी देखील मोफत तपासणी करून मोलाचे योगदान दिले.H.V. देसाई हॉस्पिटल मधील श्री खरात साहेब,भानुदास जाधव व डॉक्टर सहकारी यांनी नेहमीप्रमाणे आमच्या शब्दाला किंमत देऊन सर्व रुग्णाची मोफत शस्त्रक्रिया करून दिल्या.या डोळ्याच्या कॅम्प करिता झटलेल्या प्रत्येकाचे क्षेत्रमाहुली विकास मंच व समस्त क्षेत्रमाहुली ग्रामस्थ यांचे गौरव जाधव यांनी आभार मानले.
