जिल्हाध्यक्ष पदी निवड झालेले भीमराव शिंदे यांचा आमदार संग्राम थोपटे यांनी केला सत्कार.

Maharashtra varta

 जिल्हाध्यक्ष पदी निवड झालेले भीमराव शिंदे यांचा आमदार संग्राम थोपटे यांनी केला सत्कार.



भोर (प्रतिनिधी)

भीमराव शिंदे यांचे शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम असून महाराष्ट्र राज्य शासनाचा  आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळाला असून शिक्षक संघटनेमध्ये देखील त्यांचे मोलाचे योगदान आहे, त्यांना मिळालेले जिल्हाध्यक्ष पद हे देखील त्यांच्या कामाची पोचपावती आहे असे गौरवोद्गार भोर वेल्हा मुळशी चे आमदार संग्राम थोपटे यांनी काढले.

राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी भीमराव शिंदे यांची निवड झाल्याबद्दल आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळेस आमदार थोपटे बोलत होते,

राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा अध्यक्ष पदी  भिमराव शिंदे यांची निवड झाल्याबद्दल संग्राम थोपटे  (आमदार भोर वेल्हा मुळशी विधानसभा) यांनी सत्कार  केला.

To Top