विंझर शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा नव प्रेरणेचा आदर्श कौतुकास्पद:- कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे.
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कार्यक्रम
उत्साहात संपन्न.
वेल्हे (प्रतिनिधी)
शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे हे शैक्षणिक कार्यातून सामाजिक बांधिलकी जोपासणारे आदर्श व्यक्तिमत्व व महामानव होते. परमपूज्य बापूजींच्या शैक्षणिक विचारात समाज उद्धाराची भूमिका त्यांच्या ठायी वसलेली होती. त्यांच्या विचार-कार्याचे संत-महंत व विचारवंतांची सुसंगती होती. बहुजन समाजातील मुलांना ज्ञान देणारी आदर्शवत संस्था उभी करण्याचं काम शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी केले. या शिक्षण संस्थेत लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन समाजात गुणवंत पद्धतीने काम करतायेत. समाजाला आदर्श दाखवून देतात. विंझर शाळेतील हे माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा आयोजित करून शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या अर्ध शिल्पाकृती पुतळ्याचं अनावरण करत, माजी विद्यार्थ्यांचा आदर्श समाजाला दाखवून देऊन ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार ही मूल्य स्वतःमध्ये रुजवत नवप्रेरणेचा आदर्श दाखविला आहे, असे प्रतिपादन श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापुर चे कार्याध्यक्ष अभय कुमार साळुंखे यांनी केले
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज विंझर ता. वेल्हे येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आणि शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या अर्ध शिल्पाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापुर चे पुणे जिल्हा अर्थ विभागाचे सहसचिव प्राचार्य गवळी ,तसेच कातोबा विद्यालय दिवे चे मुख्याध्यापक बोराटे, पुरंदर हायस्कूलचे प्राचार्य मुजावर सर कृष्णा पोमण सर, पुणे जिल्ह्याचे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे निरीक्षक टेके पी एस, पोवार एम एम प्राचार्य
न्यू इंग्लिश स्कूल विंझर, शिवाजीराव भोसले ,संभाजीराव भोसले , वाघ सर, सय्यद सर, मारुती सोनवणे, लक्ष्मण महानवर ,सरपंच विनायक लीमन, उपसरपंच सागर राहुल, सरपंच हेमंत जाधव, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापुर पुणे जिल्ह्यातील विविध शाखांमधील प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रुंद या वेळेस उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल विंझर 1999 व 2001 च्या 10 वी 12 वीच्या माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे अर्ध शिल्पाकृती पुतळा उभारलेला होता, त्या अर्ध शिल्पाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा संपन्न झाला. वृक्षारोपण महत्त्व व पर्यावरणाचे रक्षण या बाबत जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
माजी विद्यार्थ्यांनी मान्यवरांचा सन्मान केला. या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची मुला-मुलींनी विविध क्षेत्रात केलेली अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान मान्यवर पाहुणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
तसेच या शाळेतील गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा व माजी विद्यार्थिनी यांचा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करताना गार्गी गायकवाड यांनी लख्ख पडला प्रकाश, दिवट्या मशालीचा, हे गीत सादर केले .पुरंदर हायस्कूल सासवडच्या स्वागत गीत व संस्थेची प्रार्थना सादर केली.
या कार्यक्रमाचे संपुर्ण संयोजन व नियोजन आयोजन न्यू इंग्लिश स्कूल, विंझरचे 1999 व 2001 चे दहावी व बारावीतील माजी विद्यार्थ्यांनी केले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्यू इंग्लिश स्कूल विंझर चे प्राचार्य पोवार सर यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.
Advertisement :-vitthal pawar anchor 9226800783.
