साद प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने मळे व पंचक्रोशी शाळांना शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वाटप.

Maharashtra varta

 साद प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने मळे व पंचक्रोशी शाळांना  शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वाटप.

नववर्षानिमित्त "साद" चा आगळावेगळा उपक्रम.


नसरापूर (प्रतिनिधी):-पत्रकार पवार सर.

प्रत्येक गावात श्रद्धास्थान असलेले  देवाचे मंदिर असते. त्याचप्रमाणे आपल्या गावातील ज्ञान मंदिर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देखील सशक्त आणि भक्कम होणे गरजेचे आहे. कारण या ज्ञानमंदिरात शिकणारे विद्यार्थी उद्याचे भावी नागरिक आहेत, देशाचे आधारस्तंभ आहेत, म्हणून हे आधारस्तंभ भक्कम करण्यासाठी विद्यार्थ्यांना घडवणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा पुरविणे हे गरजेचे आहे ,त्यासाठी शैक्षणिक सोयी सुविधा आगामी काळात भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील प्रत्येक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन साद प्रतिष्ठान पुणे चे अनुराधा ढोले यांनी केले.

"साद प्रतिष्ठान, पुणे" यांच्या वतीने मळे येथे शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप दि. 1 जानेवारी 2022 रोजी मळे ता. भोर जिल्हा पुणे येथे  मळे ,सुतारवाडी मिरकुटवाडी ,महादेव वाडी,तळे, म्हसवली, डेरे भांड्रवली इत्यादी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य किट चे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी अनुराधा ढोले, किरण कोकाटे ,डॉ. राजेंद्र पाटणकर, संजीवनी नेवे, संतोष राठोड, विनोद राठोड, एडवोकेट अनिल महले ,राजा सत्य मोहन परदेशी, जयवंत भोसले यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे व गणवेशाचे वाटप करण्यात आले. तसेच या कार्यक्रमास शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक यावेळेस उपस्थित होते.

 कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांचे स्वागत काळूराम गणपत मळेकर यांनी केले.कार्यक्रमाला उपसरपंच भाऊ मळेकर, माऊली नलावडे, विठ्ठल नाना  वरखडे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बजरंग मळेकर, मारुती हरपुडे, दिलीप राठवडे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विठ्ठल अंकुश मळेकर (गुरुजी) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



To Top