आडवलीतील त्या दस्ताची चौकशी करा :- प्रहार पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते यांची मागणी.
प्रहार पक्ष आंदोलन करणार.
वेल्हा (प्रतिनिधी):-
आडवली ता. वेल्हे येथील जमीन गट नंबर 276 दस्त क्रमांक 598/ 2017 या नोंदीबाबत वेल्हे तहसील कार्यालय, वेल्हा संबंधित मंडल अधिकारी व तलाठी यांच्या विरुद्ध तक्रारी बाबत व तहसील कार्यालय वेल्हा यांनी जावक क्रमांक 394/ 2021 दिनांक 11/ 10 /2021 रोजी उपविभागीय अधिकारी भोर यांना सादर केलेल्या अहवालाबाबतचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी दिले आहे.
आडवली येथील दस्त क्रमांक 598/ 2017 या दस्तऐवजाचे अ पत्रक व ऑनलाइन डाटा इ फेरफार ऑनलाइन म्युटिशेन तहसीलदार वेल्हा यांनी उपविभागीय अधिकारी भोर यांना अहवाल देताना तलाठी यांच्याकडे रोजनिशी तपासणी करत यामध्ये सदर दिसून येत नाही असा खुलासा अहवाल चुकीचा दिला असल्याचा आरोप प्रहार पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी केला आहे.
परंतु दुय्यम निबंधक कार्यालय कार्यालय वेल्हा यांनी 89/2021 दि.23/3/2021 च्या खुलासे नुसार सदर गट नंबर 276 दस्त क्रमांक 598 /2017 दिनांक 1/6/2017 रोजी रजिस्टर दस्ताची नोंद शासन दरबारी करून त्याच दिवशी दस्त स्कॅन करून उक्त दस्ताचे ई-फेरफार प्रणालीद्वारे ऑनलाइन म्युटिशेन करण्यात आले होते.त्याबाबत चा डेटा तहसील कार्यालय,वेल्हा यांना ई-फेरफार प्रणालीस पाठवून सदर दस्ताचे अपत्रक दुय्यम निबंधक कार्यालय वेल्हा यांनी तहसील वेल्हा कार्यालयाला यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. अ पत्रक दिले असल्याची पोहच दुय्यम निबंधक वेल्हा यांनी घेतली आहे, व त्याबाबतचा डेटा सेंड केले असल्याची प्रत आहे .जिल्हाधिकारी पुणे यांना ही बाब निदर्शनास आणून देऊ इच्छितो की तहसील कार्यालय मूळ विषयाला बगल देऊन वारंवार दिशाभूल करणारी,माहिती दिरंगाईने वरिष्ठ कार्यालयाला अर्धवट आणि अपुरी माहिती देत आहे. याचा अर्थ वेल्हा कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तलाठी व व सर्कल यांनी मिळून सदरची कागदपत्रे जाणीपूर्वक गहाळ केली आहेत, त्यामुळे सदर गटावर ते दुबार दस्त नोंदवण्यात आले आहे. सदर प्रकरणात विषय गंभीर असल्याने आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात यावी . याबाबतचे खुलासे व तक्रारी झाल्यानंतर दि. 29/ 7/ 2021 रोजी सुरेश शिंदे व इतर यांच्याकडून सदरचा दस्त रद्द करणार असल्याचे लेखी प्रतिज्ञापत्र घेऊन शासनाची दिशाभूल करत आहे. सदरचा दस्त अद्यापही संबंधित न्यायालयाकडून रद्द करण्यात आलेला नाही व नव्हता.
संबंधितांनी दुबार दस्त नोंदणीचे जाणीपूर्वक काम केले असून यात महसूल कर्मचारी, अधिकारी यांनी संगनमताने आर्थिक लाभपाई गुन्हा केलेला आहे. तसेच वेल्हा तहसीलदार यांनी उपविभागीय अधिकारी भोर यांना जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती देऊन तहसीलदार वेल्हे याबाबत योग्य चौकशी करीत नसल्याचा गंभीर आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी केला आहे.
तरी या प्रकरणाची त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करावी ,अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने 30 दिवसानंतर कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संतोष मोहिते यांनी निवेदनाद्वारे दिलेला आहे.
