देगाव विविध विकास सेवा सहकारी संस्था चेअरमनपदी तुळशीराम थिटे
नसरापूर ( प्रतिनिधी): -
"देगाव (करंदी खे.बा.) ता.भोर येथील देगाव विविध विकास सेवा सहकारी संस्था चेअरमनपदी करंदी खे.बा.चे तुळशीराम थिटे यांची बिनविरोध निवड झाली.
देगाव सोसायटीचे मावळते चेअरमन दिलीप कोंडे विहित कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामे दिले.
यावेळेस देगाव सोसायटी चेअरमनपदी तुळशीराम थिटे यांची बिनविरोध निवड झाल्याने सर्व संचालक व भालचंद्र जगताप,कुलदीप कोंडे, विक्रम खुटवड, अशोक आबा शेलार ,तुळशीराम सावंत ,तानाजी खाटपे, देगाव सरपंच शिवाजी यादव ,चंद्रशेखर यादव विशाल बंटी कोंडे, आदित्य बोरगे,राहुल बोरगे ,संदीप बोरगे,शांताराम शिंदे पदाधिकारी व सभासद यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
( देगाव विविध विकास सेवा सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन तुळशीराम थिटे म्हणाले की, भोर तालुक्यात नावाजलेली देगाव विविध विकास सेवा सहकारी सोसायटी शेतकरी सभासद व संस्थेचे हित लक्षात घेऊन प्रभावी काम करणार आहे).
