नगरसेविका राजश्री ताई नवले यांचे काम कौतुकास्पद:- खासदार गिरीश बापट.
वडगाव धायरी प्रभागात विविध वास्तूंचे लोकार्पण सोहळा संपन्न.
पुणे (प्रतिनिधी)
पुणे महानगरपालिकेच्या वडगाव- धायरी प्रभागाचे नेतृत्व करणाऱ्या राजश्रीताई नवले यांनी आपल्या प्रभागाच्या विकासासाठी मोठ्या ताकतीने विधायक कार्य करण्याची तळमळ त्यांच्या अंगी असून संवेदनशील महिला लोकप्रतिनिधी म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांची वेगळी अशी ओळख आहे, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना सर्व सामान्यांना केंद्रबिंदू मानत जनतेच्या विकास कामांना प्राधान्य देत असताना त्यांचे पाय जमिनीवर असून लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या वेदना समस्या जाणून घेण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी आहे. एखादे विकास काम मनात आले की,ते पूर्णत्वास नेण्यात पर्यंत पाठपुरावा करण्याची त्यांची क्षमता व हातखंडा हा वाखाणण्याजोगा आहे, असे नगरसेवक या मातीत आहेत, याचा मला अभिमान आहे असे गौरवोद्गार पुणे चे खासदार गिरीश बापट यांनी काढले.
वडगाव धायरी प्रभाग क्रमांक 33 ब येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुल, तसेच कै. दत्तात्रय नवले अग्निशामक केंद्राचा लोकार्पण सोहळा ,प्रमुख विशेष व सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. त्यावेळी खासदार गिरीश बापट बोलत होते ते पुढे म्हणाले की, नगरसेविका राजश्री नवले यांनी नगरसेवक पदाच्या माध्यमातून एक जनतेची सुयोग्य जबाबदारी सांभाळत आपल्या नगरसेवकाच्या कारकिर्दीत अनेक लोक उपयोगी योजना शिबीरे,लोक समस्यांचे निराकरण करत आलेले आहेत, त्यांचे काम इतर नगरसेवकांना आदर्श आणि प्रेरणादायी आहे.
खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर म्हणाले की, राजश्री नवले या सतत लोकोपयोगी कार्यात मग्न असणाऱ्या, जनसेवेचे आवड असणाऱ्या नगरसेविका आहेत, त्यांच्या प्रभागात विकासाची पहाट उगवली आहे, त्यांच्या कामाचा आदर्श घेण्यासारखे त्यांचे काम कौतुकास्पद आहे.
पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका राजश्रीताई नवले यांनी सांगितले की, माझ्या अंगी असलेली तळमळ विधायक कामातूनच जनतेसाठी उपयोगात मी आणली, मला प्रत्येक क्षणी वाटत होते की, "मी नागरिकांसाठी आहे आणि नागरिक माझ्यासाठी आहे" या ध्येयाने प्रेरित होऊन माझ्या प्रभागातील, पुणे शहरातील महिलांच्या समस्या जाणून घेण्याची त्यावर उपाय पर्याय शोधण्याची संधी मला मिळाली आणि त्या संधीचे सोने करत आदिती स्त्री योजनेसारखी प्रभावीपणे योजना ,स्त्री सबलीकरणासाठी राबवत, स्त्रीचा सन्मान उंचावण्यासाठी चे उपक्रम राबवले. महिला बालकल्याण समिती पुण्याचे अध्यक्षपदाच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लावण्याचं काम मी केलं, त्यासाठी नागरिक पदाधिकारी अधिकारी यांनी वेळोवेळी मला सहकार्य व मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी खासदार गिरीश बापट,आमदार भीमराव अण्णा तापकीर ,क्रीडा समिती अध्यक्ष अजय खेडेकर, मा. उपमहापौर आणि नगरसेवक प्रसन्न जगताप, नगरसेवक हरिदास चरवड ,खडकवासला विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सचिन मोरे ,अरुणजी राजवाडे, स्वीकृत सभासद गंगाधर भडावळे, स्वीकृत सभासद वैभव मुरकुटे, सरचिटणीस अभिजीत धावडे ,सचिन बदक ,अतुल चाकणकर, संदीप पोकळे, सागर भूमकर, अर्जुन पुरस्कार कबड्डी पट्टू शांताराम जाधव ,राष्ट्रीय कुस्ती खेळाडू राजू मते, हॉलीबॉल चे राष्ट्रीय खेळाडू विजय रणदिवे,व मान्यवर व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका सौ. राजश्री दिलीप नवले यांनी केले, उपस्थितांचे स्वागत मा.नगरसेवक बाळासाहेब नवले यांनी, तर उपस्थितांचे आभार भाजपा युवा मोर्चा संघटक सरचिटणीस सारंग नवले यांनी मानले .
