विंग सरपंचपदी स्वप्नील तळेकर यांची निवड .

Maharashtra varta

 विंग सरपंचपदी स्वप्नील तळेकर यांची निवड  .


विंग (प्रतिनिधी)  : दि ११ (अक्षय  तळेकर)

खंडाळा तालुक्यातील संवेदनशील समजणाऱ्या विंग ग्रामपंचापतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत स्वप्नील तळेकर यांची  निवड करण्यात आली . 

  विंग गावच्या सरपंच रोहिणी महांगरे यांनी पदभार सोडल्यानंतर राजीनामा देऊन नवीन युवकाला संधी देण्यासाठी   स्वप्नील तळेकर यांना बहुमत  पाच मते मिळाल्याने . या निवडणूकीत स्वप्नील विजयी झाले . स्वप्नील तळेकर यांनी या वेळी सांगितले कि, गावच्या विकासासाठी काम करणार व तरुणांना स्थानिक कंपन्या मध्ये रोजगार व कामे मिळवून देणार तसेच कै सूर्यकांत बाप्पू युवा फौंडेशन माध्यमातून अनेक उपक्रम राबवणार असे सांगितले ,या सरपंच निवडीची प्रक्रिया राबवण्यात आली या वेळी निवडणूक अधिकारी भोईटे साहेब व ग्रामसेवक लक्ष्मण पडळकर हे होते . या निवडीबद्दल आमदार मकरंद पाटील , जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले , व ग्रामस्थांनी अभिनंदन केले . 





To Top