श्री.दत्त जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न.

Maharashtra varta

 श्री.दत्त जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न.




पुणे (प्रतिनिधी):-

 शुक्रवार दि. १७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत रेनॉल्ट शोरूम, स.नं.३५, दिप कॉम्प्लेक्स, मुंबई-पुणे हायवे, बाणेर बायपास, पुणे येथे श्रीदत्त जयंतीनिमित्ताने पि.पि.एस मोटर्स प्रा.ली व जय जंगली महाराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजक प्रतिष्ठानचे अध्यक्ष  घनश्याम निम्हण यांनी केले होते .

या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल ३० रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. यावेळेस रक्तदात्यांना हेल्मेट व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले, 

व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या सर्व आदरणीय मान्यवर, नागरीक, रक्तदाते यांचे आभार मानत सर्वांना श्रीदत्त जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा प्रतिष्ठानचे अध्यक्ष घनश्याम निम्हण यांनी दिल्या.

To Top