कर्नवडी बेघर वस्तीमध्ये सपोर्टिव्ह एक विदयुत पुरवठा करणारा पोल टाका.:-

Maharashtra varta

 कर्नवडी बेघर वस्तीमध्ये सपोर्टिव्ह एक विदयुत पुरवठा करणारा पोल टाका.:-

अखिल भारतीय बंजारा युवा सेनेची मागणी.


खंडाळा (प्रतिनिधी):-

ग्रामपंचायत कर्नवडी, ता. खंडाळा याठिकाणी गट नं. ५१४ येथे गेली बऱ्याच वर्षांपासून लोकवस्ती आहे. याठिकाणी विदयुत पुरवठा करणारा पोल हा मुख्य रस्त्यावर आहे व त्याठिकाणापासूनचे लोकांच्या बेघर वस्तीपर्यंतचे अंतर जास्त असल्याने वारंवार केबल कट होणे, तुटून खाली पडणे, लोंबकळून राहणे यामुळे येथील लोकांनी वेळोवेळी खर्च करून त्याची दुरुस्ती केली.कर्नवडी बेघर वस्तीमध्ये सपोर्टिव्ह एक विदयुत पुरवठा करणारा पोल उभारावा ,अशी मागणी विद्युत वितरण कंपनी कडेअखिल भारतीय बंजारा युवा सेनेचे सातारला जिल्हा युवा अध्यक्ष नितीन पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत लोहोम या ठिकाणी असणारे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे अधिकारी यांना वेळोवेळी कल्पना देवून त्यांना प्रत्यक्ष ठिकाणी जी परिस्थिती आहे ती दाखवली असता यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा काढला गेला नाही. त्यांच्याकडून असे म्हणण्यात आले की, हा सर्व खर्च वास्तव्यास असणाऱ्या लोकांनी स्वखर्चाने करावा ,यासंबंधित अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी. कदाचित या वरील सर्व प्रकारामुळे जिवितहानी व अनुसुचित प्रकार घडू शकतो. याठिकाणी तात्काळ पाहानी करून योग्य ती उपाययोजना करावी, अन्यथा अखिल भारतीय बंजारा युवा सेना सातारा यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ऑफिससमोर वास्तव्य करणाऱ्या लोकांसमवेत तीव्र  आंदोलन  करू व यास पूर्णत: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी जबाबदार राहतील. असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

या वेळेस वसंत चव्हाण (अखिल भारतीय बंजारा युवा सेना खंडाळा तालुका अध्यक्ष)व जालिंदर  पवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

To Top