सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणे जिल्हा क्रिडा विभागीय समितीअंतर्गत आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धेमध्ये शंकरराव भेलके नसरापुर महाविद्यालयाच्या मुलींच्या संघास विजेतेपद.

Maharashtra varta

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणे जिल्हा क्रिडा विभागीय समितीअंतर्गत आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धेमध्ये शंकरराव भेलके नसरापुर महाविद्यालयाच्या मुलींच्या संघास विजेतेपद.



नसरापूर (प्रतिनिधी)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणे जिल्हा क्रीडा विभागीय समितीअंतर्गत आयोजित आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव  भेलके महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले या स्पर्धेमध्ये  पाचशे हुन अधिक खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धा संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल भोसरी येथे पार पडल्या. या स्पर्धेत 100 मीटर धावणे कु वायकर शीतल प्रथम क्रमांक, 200 मीटर धावणे कु वाईकर शीतल द्वितीय क्रमांक ,200 मीटर धावणे कु संध्या कोंडे तृतीय क्रमांक ,5000 मी धावणे कु ऋतुजा वाल्हेकर द्वितीय क्रमांक,10000मी हजार मीटर धावणे कु शिंदे धनश्री तृतीय क्रमांक, भालाफेक कु यादव गौरी तृतीय क्रमांक, स्टीपल चेस यादव कु गौरी द्वितीय क्रमांक,4x100 मी रिले कु ऋतुजा  वाल्लेकर कु सायली दामगुडे कु संध्या कोंडे कु वायकर शीतल, प्रथम क्रमांक4x400 रिले कु ऋतुजा वाल्हेकर कु यादव गौरी ,कु संध्या कोंडे ,कु सानिका झेंडे यांनी प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या मुलींच्या संघास मैदानी स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवून दिले. वरील सर्वांची पुणे जिल्हा क्रीडा विभागीय समितीच्या संघात निवड झाली आहे .तरी त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा अजित दादा पवार साहेब, उपाध्यक्ष मा राजेंद्र घाडगे, मानद सचिव मा संदीप कदम ,खजिनदार  मा मोहनराव देशमुख उपसचिव एल एम पवार साहेब शारीरिक शिक्षण संचालिका प्रा पोर्णिमा कारळे बनेश्वर क्रिडा प्रबोधनी चे  चे ॲथलेटिक्स चे मार्गदर्शक श्री सुधांशू खैरे सर व प्राचार्य डॉ तुषार शितोळे सर यांच्या वतीने  अभिनंदन  करून व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

To Top