ज्येष्ठ निराधार वंचितांना जीवनदान देणारे जीवनचंद्र देशमुख सर.

Maharashtra varta

 ज्येष्ठ निराधार वंचितांना जीवनदान देणारे जीवनचंद्र देशमुख सर.


खंडाळा:-(प्रतिनिधी)

पारगाव (खंडाळा) जि. सातारा येथील जीवनचंद्र देशमुख सर आपल्या पेन्शन मधील ठराविक रक्कम निराधार ,वंचित, ज्येष्ठ नागरिकांना देऊन त्यांना आधार देण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या या आदर्शांची चर्चा खंडाळा तालुक्यात व सातारा जिल्ह्यामध्ये होत असून त्यांचे विशेष कौतुक समाजातून होत आहे.


शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतात तर काहीजण आपापले छंद जोपासतात. उर्वरित आयुष्य समृद्ध जगण्याचा प्रयत्न करतात. त्या सर्वांच्या पलीकडे जाऊन सातारा जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख व आदर्श निवृत्त शिक्षक खंडाळा तालुक्यातील पारगाव खंडाळा येथील जीवन चंद्र देशमुख सर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर ज्यांना मदतीची गरज आहे ,जे वंचित,निराधार आहेत, त्यांना ते आपल्या पेन्शनमधील काहीशी रक्कम ज्येष्ठ नागरिक संघ यांना  देऊन निराधारांना आर्थिक मदत निरपेक्ष निस्वार्थी भावनेने करत आहे .


जीवन चंद्र देशमुख म्हणाले की, धर्मकारण ,राजकारणाच्या पलीकडे माणसाला काम करता आलं पाहिजे .असेच काम मी उत्तरोत्तर करत राहणार आहे .या कामाचा आपण देखील प्रेरणा घेऊन वंचितांना मदतीचा हात द्या असे आवाहन त्यांनी केले आहे.

To Top