अशोक वाडकर यांना आगामी काळात संधी देणार...कुलदीप कोंडे.
अशोक वाडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
खेडशिवापुर ( प्रतिनिधी):-
अशोक वाडकर हे गेली दहा वर्ष विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबवत आहे. महिला सक्षमीकरणाचे उपक्रम राबवत आहेत. गावातील महिलांसाठी देवदर्शन यात्रेचे दरवर्षी ते आयोजन करत आहेत.कोरोना काळात प्रतिबंधात्मक साहित्य तसेच अन्नधान्य किट वाटप तसेच रुग्णांना मानसिक स्थैर्य व आधार देण्याचे काम तसेच रुग्णांच्या हॉस्पिटल बिलामध्ये सवलती मिळवून देण्याचं काम केले आहे .बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत केंद्र भोर, तालुक्याचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे. अशा सामाजिक, राजकीय क्षेत्रात भरीव काम करणारे अशोक वाडकर यांना आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाला सुयोग्य संधी दिली जाईल असे प्रतिपादन पुणे जिल्हा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे यांनी केले.
वर्वे ता. भोर येथील शिवनेरी मंगल कार्यालयात भोर तालुका शिवसेनेचे संघटक अशोक वाडकर यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला, त्यावेळेस कोंडे बोलत होते.
शिवसेना संघटक अशोक वाडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भोर तालुक्यात मोफत लसीकरण व मतदान नोंदणी अभियान शिबिराचे व माऊली अनाथालय येथे विद्यार्थी खाऊ व ब्लॅंकेट वाटप,आर्थिक मदत व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
पश्चिम महाराष्ट्र शिवसेना सहकार आघाडीचे प्रमुख प्रदीप खोपडे म्हणाले की, , शिवसेनेचा कार्यकर्ता असलेला अशोक वाडकर हा एक साधा सरळ ,प्रामाणिक व पक्ष निष्ठा असलेले व्यक्तिमत्त्व आहे.गेल्या 10 वर्षांपासून भोर तालुक्यात केलेले सामाजिक ,कृषी,वैद्यकीय क्रीडा,शिक्षण आदी क्षेत्रांत चांगलं काम केलेले आहे.अशोक वाडकर हा कार्यकर्ता हा कधी सत्कारासाठी काम करणारा नाही.सत्कार्यासाठी स्वतःला झोकून देऊन समाजाची सेवा चांगली करत आहे. त्यांचे काम सुयोग्य आहे.आगामी काळात त्यांच्या कामाची दखल पक्ष घेईलच , असे म्हणत येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असे संकेत वाडकर यांना दिले असल्याचे पाहण्यास मिळत आहे.
पुणे जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेशबापू कोंडे म्हणाले की, अशोक वाडकर यांनी भगवे वादळ प्रतिष्ठान व शिवसेना संघटकच्या माध्यमातून सामाजिक कार्य चांगले केले असून त्यांची कामांची उचित दखल पक्ष घेऊन सुयोग्य संधी दिली जाईल.)
भोर तालुका शिवसेनेचे संघटक अशोक वाडकर म्हणाले की, आगामी काळातल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मी काम करत नाही. तर मी जनतेचा आहे. आणि मी जनतेसाठी काम करीत आहे. आगामी काळात देखील माझ्या कामाची उंची दिवसेंदिवस कशी वाढेल, गोरगरीबांना माझ्या कामाच्या माध्यमातून मदत मार्गदर्शन आणि सहकार्य कसे मिळेल, याकडे मी जास्त लक्ष देऊन तेवढ्याच वेगाने अधिकाधिक काम करून दाखवणार आहे.
अंकुश तात्या सावंत,गणेश गोळे,केदार देशपांडे,निलेश गिरमे, नगरसेवक दीपक नागपुरे,भोर पंचायत समितीचे सभापती लहू नाना शेलार ,माऊली पांगारे,कुलदीप कोंडे ,रमेश बापू कोंडे,प्रदीप खोपडे यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी पुणे जिल्हा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे ,शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, पश्चिम महाराष्ट्र सहकार सेना अध्यक्ष प्रदीप खोपडे, माजी उपसभापती अमोल पांगारे ,खडकवासला शिवसेनेचे विभागप्रमुख निलेश गिरमे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुबंई चे उपसभापती धनंजय वाडकर , पंचायत समितीच्या सभापती लहू नाना शेलार, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक दीपक नागपुरे ,राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक पोपटराव सुके,राजगड सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विकास नाना कोंडे, राष्ट्रवादी काँग्रेस हवेलीचे सरचिटणीस नानासाहेब धोंडे, वेळूचे आदर्श मा.सरपंच माऊली पांगारे,हिरामण पांगारे, मनसेचे हवेली अध्यक्ष अजित पवार, आंबेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य चेतन मांगडे ,गाउडदरा गावचे चे सरपंच राकेश गाडे, आदित्य बोरगे ,सचिन बांदल, संतोष भिलारे ,प्रमोद शिळीमकर, विक्रांत भोरडे, अमित गाडे, गणेश धुमाळ ,दिपक बर्डे ,केदार देशपांडे, युवराज जेधे,नितीन सोनवणे ,भरत साळुंखे ,विशाल जाधव, जीवन लीमन ,विशाल खुटवड, प्रवीण शिंदे ,ऋषिकेश चराटे ,गणेश गोळे व विविध गावाचे नागरिक व मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थित होते.
या वाढदिवस समारंभाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिध्द निवेदक विठ्ठल पवार यांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्हा युवा सेनेचे समन्वयक आदित्य बोरगे यांनी केले.उपस्थितांचे आभार भोर तालुका युवासेनेचे विभागप्रमुख गणेश कांबळे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी शुभम पवार, विशाल सणस, शिवाजी वाडकर, गणेश सनस, ओंकार पवार ,गणेश कांबळे, स्वप्निल शेटे ,किरण कोंडे ,सिद्धेश शेटे,आणि प्रवीण शेटे यांनी परिश्रम घेतले.
