साप हा शेतकऱ्यांचा मित्र :-सर्पमित्र विशालभाऊ शिंदे.
नसरापूर (प्रतिनिधी):-
ग्रामीण भागात सापांबद्दल अनेक समज-गैरसमज आपल्याला दिसून येतात .साप डूख धरतो, तो साप हा आपला शत्रू आहे असे गैरसमज समाजामध्ये निर्माण होऊन, साप दिसला की माणसांना बोलवा आणि सापाला मारा असे गैरसमज- गैरसमजुती मधून वन्य पशु पक्ष्यांची हत्या आपण करत असतो .मात्र हे वन्यपशू आपले मित्र आहेत. त्यातील साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे असे प्रतिपादन भोर तालुक्याचे प्रसिद्ध सर्पमित्र विशाल भाऊ शिंदे यांनी केले.
नसरापूर ता.भोर येथे कुंभारकर लॉन्स येथे कराटे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असो मार्फत नसरापूर Taekwondo ( कराटे) क्लब च्या मुलांना सापा बद्दल छोटीशी माहिती सांगण्यात आली व साप चावला असता प्राथमिक उपचार कसे करावे हे सांगण्यात आले .
नसरापूर गावातील सर्पमित्र स्वप्नील शिंदे, विशाल शिंदे ,सोनु खेडेकर यांनी सर्व मुलांना माहिती दिली. यावेळेस कराटे शिकवणारे प्रशिक्षक जितेंद्र भगत व निकम ताई व शेख उपस्थित होते.
