नसरापूर चे सर्पमित्र देत आहे ,सापांना वरदान.

Maharashtra varta

 नसरापूर चे सर्पमित्र देत आहे ,सापांना जीवदान.


नसरापूर (प्रतिनिधी)

 केळवडे गावामध्ये सर्प असल्याची माहिती मिळाली असता तात्काळ नसरापूर चे सर्पमित्र स्वप्निल शिंदे व विशाल शिंदे यांनी केळवडे गावात जाऊन सर्प पाहिला असता  दुर्मिळ जातीचा साप म्हणजे मांडूळ साप होता. अशा या दोन सर्पमित्रांनी या दुर्मिळ सापाला जीवदान दिले तसेच नसरापूर गावातील सर्पमित्रांनी नसरापूर लगतच्या गावांमध्ये काही दिवसांपासून  मानवी घरांमधील सर्प पकडून त्याना जीवदान देत आहे. तसेच नसरापूर गावातील सर्व सर्पमित्रांनी मिळुन  दोन दुर्मिळ जातीचे साप म्हणजे मांडूळ हे नसरापूर वन विभागाच्या  rfo जाधवर यांच्या स्वाधीन करण्यात आले तेव्हा पुणे जिल्हा वन्य प्राणी आणि साप संरक्षण संघटना अध्यक्ष सुशील विभूते व सर्पमित्र सोनु खेडेकर विलास धोंगडे सनी कडके साहिल भंडारी  समर्थ हे सर्पमित्र उपस्थित होते.

To Top