राज्यमंत्री बच्चू कडू माऊलींच्या चरणी लीन.
पुणे (प्रतिनिधी):- पत्रकार विठ्ठल पवार.
"पहाटेची बोचरी थंडी, सनईचा मंजूळ स्वर, फुलांची आकर्षक सजावट आणि काळ्याभोर पाषाणातील संजीवन समाधी वर चांदीचा मुखवटा ठेवून 11 ब्रह्मवृंदानी केलेल्या मंत्रघोषात कार्तिकी एकादशीनिमित्त माउलींच्या चरणी राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांनी आपला माथा टेकवत माऊलींचे रूपाचे दर्शन घेत अलंकापुरीच्या भक्तीरसात ते न्हाऊन निघाले.
कार्तिकी वारी आणि माऊलींच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यासाठी मोठ्या भाविक भाविकांच्या भक्तीने अलंकापुरी तील कार्तिकीचा सोहळा सजला होता .
राज्यमंत्री बच्चू कडू यांचं आगमन आळंदी या ठिकाणी झालेले असताना अफाट कार्यकर्त्यांच्या व भाविक भक्तांच्या उपस्थितीत माऊलींच्या समाधीवर माथा टेकवत मनोमन दर्शन घेतले. व त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्तिकी एकादशी आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं श्री क्षेत्र आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. गाथा मूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांचे आश्रमामध्ये जाऊन वारकरी धर्मामध्ये अत्यंत पवित्र असलेली तुळशीची माळ गुरुवर्य गाथा मुर्ती रामभाऊ महाराज राऊत यांनी घातली.
कंठी मिरवा तुळशी ! व्रत करा एकादशी! गरिबांची कष्टकऱ्यांची सेवा करा आज तुमचा परमार्थ आहे . असा उपदेश गुरुवर्य राऊत महाराजांनी केला.
या प्रसंगी पुणे जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष अनंत काळे व प्रहारचे नेते अजय महाराज बारस्कर, व प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
