सचिन राव डिंबळे शिक्षक आमदारकीची तयारी करा - खासदार सुप्रियाताई सुळे खासदार सुप्रियाताई सुळे व पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित दादा शिवतरे यांचे प्रतिपादन.
पुणे, ता. ७ :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेमध्ये हजारो शिक्षकांचे बळकट संघटन निर्माण करून शैक्षणिक क्षेत्रात प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा व राज्य स्तरावर समस्यांची प्राधान्याने सोडवणूक करणारे शिक्षक नेते सचिन डिंबळे हे एक उत्कृष्ट संघटक, उत्कृष्ट नेतृत्व व उत्कृष्ट कर्तृत्व निर्माण करणारे आहेत. आगामी काळात त्यांनी शिक्षक आमदारकीची तयारी करावी, असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदार संघाचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी काढले.
शिक्षक राज्यसंघ व अखिल भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यां च्या नुतन निवडीमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ नगरपालिका व महानगरपालिकासाठी महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष पदी पुण्याचे शिक्षक नेते सचिन डिंबळे यांची निवड करण्यात आली होती. त्या निवडीबद्दल पुण्यामध्ये बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे व पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या हस्ते शिक्षक नेते सचिन डिंबळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यावेळेस खासदार सुळे बोलत होत्या, पुढे त्या म्हणाल्या की, शिक्षकांचे प्रश्न समजावुन घेणे, ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे व शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देणे हे काम सचिन डिंबळे यांनी केले आहे.
पुणे शहरातील शिक्षकांची बांधिलकी जपुन संघटनेचे काम त्यांनी उत्कृष्ट केले आहे. आगामी काळात शिक्षक आमदारकीसाठी तयारी करा, असे संकेत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिले.
यावेळी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, सरचिटणीस खंडेराव ढोबळे, कार्याध्यक्ष पोपटराव निगडे, भोर ता.प्राथ. शिक्षक संघाचे अध्यक्ष सुदामराव ओंबळे, जुन्नरचे अध्यक्ष विकास मटाले, सरचिटणीस संतोष पानसरे, वेल्ह्याचे अध्यक्ष वसंत हारपुडे, कोषाध्यक्ष साधु हारपुडे, पुणे जि. केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, वसतिगृहाचे कोषाध्यक्ष धनंजय जगताप, शिक्षक नेते आप्पा सावंत, पंडित गोळे, विजयकुमार थोपटे, शिवाजी जाधव, भिमराव शिंदे, संजय वाल्हेकर, विकास खुटवड, भरत कुडपणे, सुदेव नलावडे, संतोष कडाळे हे उपस्थित होते.
(पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे म्हणाले की, दोन दशकाहून अधिक काळ शिक्षण व शिक्षकांसाठी प्रभावी पणे काम सचिन डिंबळे करत आहेत. आगामी काळात शिक्षकांचे प्रतिनिधीत्व म्हणुन शिक्षक आमदारकी लढवण्यासाठीचे काम त्यांनी सुरु करावे.)
