भोर -वेल्हे प्राथमिक शिक्षक समितीचे वतीने विद्यार्थी व शिक्षकांची शासनाला हाक, शासन दरबारी तहसीलदार यांना दिले निवेदन .
भोर-वेल्हे (प्रतिनिधी):-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळातील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या मागण्यांच्या सोडवणुकीसाठी भोर आणि वेल्हे तालुक्यातील प्राथमिक शिक्षक समितीचे प्रांत अधिकारी कार्यालय, भोर या ठिकाणी लक्षवेधी धरणे/ निदर्शने करण्यात आली व शासनाने विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष द्यावे, त्या प्राधान्याने समस्या सोडवा अशी आर्त हाक शिक्षक समितीच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.भोर व वेल्हे तालुक्यातील प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकार्यांनी भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधले आहे.
प्रलंबित प्रश्न व मागण्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत भेदभाव न करता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी मधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळावा. मागासवर्गीय बीपीएल कुटुंबातील विद्यार्थिनींचा दैनिक उपस्थिती भत्ता एक रुपया ऐवजी पंचवीस रुपये करावा. किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी शाळेत मोफत सॅनिटरी नॅपकिन व वापरलेले नॅपकिन्स नष्ट करण्यासाठी ची सुविधा मिळावी. प्राथमिक शिक्षण सेवकांचे मानधन सहा हजार रुपये वरून पंचवीस हजार रुपये करावे. 1 नोव्हेंबर 2005 पासून नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी .वरिष्ठ वेतन श्रेणी संबंधाने सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात .शिक्षकांच्या डीसीपीएस कपात रकमांचा हिशोब घोळ दूर करावा. पूर्वाश्रमीच्या वस्तीशाळा शिक्षकांची प्रथम नियुक्ती तारीख सर्व प्रकारच्या लाभासाठी मान्य करावी. तसेच दरमहा वेतनास होणारा विलंब दूर करून एक तारखेला वेतन मिळावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी च्या संचमान्यता निकषात बदल करावेत .सर्व जागा तात्काळ भराव्यात .शासन परिपत्रक 13 ऑक्टोबर 2016 चे रद्द करून पदवीधर विषय शिक्षकांना भेदभाव न करता पदवीधर वेतनश्रेणी मिळावी. ग्रामीण भागातील शिक्षकांनी मुख्यालय राहण्याबाबत चे नऊ सप्टेंबर 2019 चे परिपत्रक रद्द करावे. जून 2014 ची अधिसूचना रद्द करून राज्यातील केंद्रप्रमुख व त्यांच्या रिक्त जागा प्राथमिक शिक्षकातून भराव्यात. जिल्हांतर्गत बदल्या संबंधाने संघटनेशी चर्चा करून सुधारणा कराव्यात. त्याची कार्यवाही सुरु करावी .आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करावे.अशा विविध मागण्या साठी शिक्षक समितीने महाराष्ट्रभर लक्षवेधी राज्यव्यापी धरणे निदर्शने केली आहेत.
यासाठी शिक्षक समितीचे नेते संजय पवार, भरत शेंडकर ,भोर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष महेंद्र शिंदे, उपाध्यक्ष गणेश सटाले, सरचिटणीस सुरेश खोपडे, वेल्हे तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष मोहन धरपाळे, वेल्हा तालुका शिक्षक समितीचे सरचिटणीस कुमार कापसे, जिल्हा प्रतिनिधी सु.की. कदम, संदीप जगताप ,शरद पवार, रवींद्रनाथ थोपटे ,दीपक बोडरे, प्रकाश वनवे, महिला प्रतिनिधी राजश्री रायकर- पवार,शुभांगी खोपडे , मनीषा थोपटे, वेल्हे तालुका महिला आघाडी अध्यक्ष शुभांगी भोसले, वेल्हे तालुका कार्याध्यक्ष संपत आदवडे, उपाध्यक्ष निलेश रेनुसे, संघटक विनोद वैद्य, जिल्हा पतसंस्था सचिव विकास गायकवाड, रामदास दिघे शिक्षक नेते ,कोषाध्यक्ष शंकर जोरकर आदी उपस्थित होते.
