विंग येथे कै.सूर्यकांत (बाप्पू) तळेकर यांच्या स्मरणार्थ भव्य क्रिकेट सामने संपन्न.

Maharashtra varta

 विंग येथे कै.सूर्यकांत  (बाप्पू) तळेकर यांच्या स्मरणार्थ भव्य क्रिकेट सामने संपन्न.


विंग  -( दिं. ७) प्रतिनिधी -अक्षय तळेकर.

विंग ता.खंडाळा येथे कै.सूर्यकांत (बाप्पु ) तळेकर युवा फौंडेशन तळेकरवस्ती यांच्या स्मरणार्थ भव्य हाप पिच नाइट लॉंग टेनिस बॉल सामने रामेश्वर विद्यालय विंग मैदानावर विंग प्रीमियर लीग २०२१ पर्व ४ थे आयोजन करण्यात आले होते.गेली पाच दिवस नाईट सामने चालू होते.या वेळी गावातीलच सर्व खेळाडूंचे प्रत्येक संघ मालकाने वेगवेगळे खेळाडू निवड करून आठ संघ तयार करण्यात आले.त्यामुळे गावातील खेळाडू प्रत्येक संघ नंबर मध्ये येण्यासाठी कसोटीने व जिद्दीने खेळत होते.

व दिवाळीची सुट्टी मध्ये नाईट सामने असल्यामुळे गावातील बाहेर गावी कामासाठी व व्यवसायासाठी असणारे सुट्टी निमित्ताने गावाला येऊन विंग सह परिसरातील क्रिकेट प्रेमींनी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. कै.सूर्यकांत (बाप्पू) तळेकर युवा फौंडेशन यांनी सामने उत्कृष्ट पद्धतीने शांततेत पार पडले. त्याच बरोबर आकर्षक अशी  बक्षिसे व मोठी ट्रॉफी ठेवण्यात आल्या होत्या. ट्रॉफी  पाहण्यासाठी सुद्धा अनेकांची गर्दी झाली होती .आठ संघामधून चार नंबर काढायचे होते. व त्या मध्ये प्रथम क्रमांक बक्षीस मिळवले ते कै.सूर्यकांत (बाप्पू)फायटर्स या संघाने मिळवला तर  दुसरा क्रमांक 'विंग थंडर्स,या संघाने मिळवला तर तिसरा क्रमांक कै.सूर्यकांत (बाप्पू)वॉरियर्स या संघाने मिळवला तर,चौथा क्रमांक 'शिवशंभो टायगर्स ,या संघाने मिळवला या वेळी फटाके फोडून खेळाडूंनी विजयाचा जल्लोष केला या वेळी बक्षीस वितरण करताना सर्जेराव तळेकर,सिताराम तळेकर,महादेव महांगरे,मोहन तळेकर ,यशवंत महांगरे,पांडुरंग तळेकर नितीन महांगरे,मछिंद्र महांगरे,स्वप्नील तळेकर,धनंजय मानकर सुनील पवार संकेत महांगरे,लक्ष्मण तळेकर ,तुषार तळेकर वैभव तळेकर,शिवराज तळेकर  व विंग ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी सूत्रसंचालन विजय तळेकर यांनी केले.













To Top