मतदार नोंदणी विशेष मोहिमेत सहभागी होऊन मतदार नोंदणी करून घ्या:- मृणालिनी सावंत
भोर तालुक्यात उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांचा दौरा संपन्न.
खेडशिवापुर (प्रतिनिधी):-
1 डिसेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी संक्षिप्त पूर्ण निरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी विशेष मोहीम पुणे जिल्ह्यात प्रभावीपणे व तळागाळापर्यंत राबवण्यात येत आहे. याबाबत संपूर्ण प्रशासन कामाला लागले असून मतदार विशेष नोंदणी मोहीम मध्ये नवमतदार यांची लक्षणीय नोंदणी होताना दिसत आहे
13 नोव्हेंबर 2021 या दिवशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांचा पुणे जिल्ह्यातील भेट दौरा सुरू असताना आज भोर तालुका दौरा संपन्न होत असताना उपजिल्हा निवडणूक निर्णय उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी वेळु येथे भेट देत जास्तीत जास्त तरुणांनी व कामगारांनी,दिव्यांग यांनी आपापली मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करून घ्यावी ,असे आवाहन सावंत यांनी केले.
यावेळेस भोरचे प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे , व भोरचे तहसीलदार सचिन पाटील यावेळेस उपस्थित होते. मतदार यादी संक्षिप्त पुनर्निरीक्षण मध्ये मतदार नोंदणी विशेष मोहीम प्रभावीपणे तालुक्यामध्ये राबविण्यात येत असल्याचे त्यांनी "न्यूज वार्ता'' शी बोलताना सांगितले
वेळू येथील काकडे लेझर कंपनीतील कामगारांनी देखील मतदार यादीमध्ये आपली नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन यावेळेस करण्यात आले.
यावेळेस वेळू गावचे सरपंच आप्पा धनावडे ,मा. सरपंच ज्ञानेश्वर माऊली पांगारे ,उद्योजक हिरामण पांगारे, मंगेश सुर्वे,अमोल पांगारे , ईश्वर पांगारे जीवन धनावडे ,ज्ञानेश्वर पांगारे व ग्रामस्थ उपस्थित होते.
