मराठी तरुणांनो उद्योग व्यवसायाकडे वळा:-खासदार सुप्रिया सुळे.
खुटवड नगर कामथडी येथे अनुप पेट्रोलियम" चा शुभारंभ सोहळा संपन्न.
नसरापूर (प्रतिनिधी)
उद्योग व्यवसाय मध्ये विशिष्ट माणसे होती. मात्र आता मराठी माणूस उद्योग व्यवसाय मध्ये चांगल्या पद्धतीने वाटचाल करत आहे .आणि त्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून समाजामध्ये आपली प्रतिमा घडवताना दिसत आहे.आता आपला मराठी माणूस आपल्या समाजासमोर, बांधवा समोर एक आदर्श म्हणून काम करताना आज पाहण्यास मिळत आहे.ही बाब नक्कीच स्वागतार्ह आहे. त्यासाठी मराठी तरुणांनो उद्योग व्यवसायास महत्व द्या, असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी काढले.
खुटवडनगर कामथडी ता. भोर येथे खुटवड व खंडाळे आणि बोडके परिवार यांनी सुरू केलेल्या "अनुप पेट्रोलियम" चा शुभारंभ सोहळा संपन्न झाला.त्या प्रसंगी खासदार सुळे बोलत होत्या.
या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी अशोक खुटवड व खंडाळे,बोडके परिवारांचे अभिनंदन केले व व्यवसाय क्षेत्रातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला.
या सोहळ्यास भारत पेट्रोलियमचे प्रादेशिक प्रबंधक सी. एच. विनोद, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विक्रम खुटवड, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, मा. जिल्हा परिषद सदस्या तृप्ती ताई खुटवड,आदर्श मा. जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे ,मा. गटनेते यशवंत डाळ ,भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष घोरपडे, रेल्वे बोर्डाचे सदस्य प्रवीण शिंदे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष गणेश खुटवड,गणेश निगडे, आदी उपस्थित होते.
यावेळेस अनुप पेट्रोलियमचे प्रोप्रा. छाया खुटवड व विक्रम खुटवड यांनी मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुप पेट्रोलियम प्रो.प्रा. अशोक खुटवड यांनी केले तर या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले तर आभार गणेश खुटवड यांनी मानले
