भुलेश्वर व सिद्धेश्वर या बंधूंचे व्यवसायिक काम चांगले:- सभापती लहू नाना शेलार.

Maharashtra varta

 भुलेश्वर व सिद्धेश्वर या बंधूंचे व्यवसायिक काम चांगले :-सभापती लहू नाना शेलार.




नसरापूर (प्रतिनिधी)

समाजामध्ये आपल्या दैनंदिन कामकाज व  समाजात बांधिलकी जपणे, समाजासाठी तळमळीने काम करणे व एखादे सोपवलेले व्यावसायिक काम प्रामाणिकपणे करणे, यातून त्या व्यक्तीचे वर्णन होत असते. केवळ बाह्यरंग महत्त्वाचे नसून अंतरंग महत्त्वाचे आहे .त्या अंतरंगाला महत्व द्या, असे प्रतिपादन भोर पंचायत समितीचे सभापती लहू नाना शेलार यांनी केले .

करंदी खे. बा. ता. भोर येथे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक भुलेश्वर गायकवाड यांच्या वाढदिवस समारंभानिमित्त सभापती लहू नाना शेलार बोलत होते ते पुढे म्हणाले की, आपले काम चांगले प्रामाणिकपणे निष्ठेने केल्यास हमखास यश मिळते. करंदी खे. बा.येथील गायकवाड बंधू यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भुलेश्वर गायकवाड व त्यांचे भाऊ सिद्धेश्वर गायकवाड यांनी उद्योग-व्यवसायात साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ठेवत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्याचे आज आम्ही कौतुक करत आहोत की, असे युवक आपल्या पायावर उभे राहून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण करत आहेत .त्यांच्या या कार्यास शुभेच्छा देतो. आणि आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, ज्या वेळेस आपल्याला मदत लागली त्या वेळेस निश्चितपणे माझी मदत आपणास होईल असे लहू नाना शेलार यांनी सांगितले.

यावेळी सभापती निवड झालेबद्दल लहू नाना शेलार यांचा सत्कार करण्यात आला.  सिद्धेश्वर गायकवाड आणि अलकाताई तळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळेस भोर पंचायत समितीचे सभापती लहु नाना शेलार व उपस्थित मान्यवरांनी भुलेश्वर गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून आनंद साजरा केला.

भोर पंचायत समितीचे सदस्य रोहन  बाठे,करंदीच्या सरपंच अलकाताई तळेकर,भोर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जीवन आप्पा कोंडे भोर तालुका काँग्रेस पक्षाचे युवा नेते राहुल  बोरगे, भोर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष महेश टापरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सोमनाथ निगडे,उपसरपंच नितीन इंगुळकर, उद्योजक सचिन भाऊ जाधव ,सागर शिंदे स्वप्निल भाऊ कोंडे, माऊली कोंडे, सुरज कोंडे, मनोज पाटील कोंडे, योगेश बाठे  शुभम मोहिते ,सागर शेठ कामठे, दादा गायकवाड, भैया भोसले, अमोल गायकवाड, तुकाराम बोरगे आदी उपस्थित होते.

To Top