रिपब्लिकन सेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
भोर( प्रतिनिधी)
भोर व वेल्हा रिपब्लिकन सेनेचा 23 वा वर्धापन दिन, भोर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भोर व वेल्हे रिपब्लिकन सेनेच्या वतीने वर्धापन दिनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय, भोर येथे रुग्णांना फलाहार वाटण्यात आला.यावेळी रिपब्लिकन सेना भोर वेल्हा मुळशी विधानसभा अध्यक्ष किशोर भाऊ अमोलिक यांनी माहिती दिली की, नोव्हेंबर 1998 या वर्षी संघटनेची स्थापना करण्यात आली. यावेळी सरसेनानी आनंद राज आंबेडकर यांचे घोषवाक्य होते की. तुम्ही मला साथ द्या ,मी तुम्हाला सत्ता देतो तेव्हा, सरसेनानी आनंदराज यांना साथ द्या. सत्ता नक्कीच मिळेल.
वर्धापन दिनानिमित्त भोर तालुका अध्यक्ष सतीश आडसुळ वेल्हा तालुकाध्यक्ष तानाजी गायकवाड ,युवा तालुका अध्यक्ष दत्तात्रय जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी कोव्हीड कायद्याचे पालन करून उपजिल्हा रुग्णालय भोर आरोग्य सेविका यांच्या हस्ते रुग्णांना फलहार देण्यात आला.
